विजयनगर : अरमान जाफरच्या (२६८ चेंडूंत नाबाद ११६)शतकी खेळीच्या जोरावर मुंबईचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब-गटाच्या सामन्यात आंध्र प्रदेशविरुद्ध सुस्थितीत पोहोचला आहे. मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद २९० धावसंख्येपर्यंत मजल मारली असून त्यांच्याकडे ५२ धावांची आघाडी आहे.

दुसऱ्या दिवशी मुंबईच्या संघाने १ बाद २५ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल (४५) आणि जाफरने संघासाठी धावा करणे सुरूच ठेवले. दोघांनीही दुसऱ्या गडय़ासाठी अर्धशतकी भागीदारी रचली. शोएब मोहम्मद खानने जैस्वालला बाद करत ही भागीदारी मोडीत काढली. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे (४४) व जाफरने संघाचा डाव सावरला. रहाणे बाद झाल्यानंतर सर्फराज खान (५), हार्दिक तामोरे (१०) आणि शम्स मुलानी (१०) माघारी गेल्याने संघाची अवस्था ६ बाद २२५ अशी बिकट झाली.

एकीकडे फलंदाज बाद होत असताना जाफरने संघाची एक बाजू सांभाळून ठेवत धावसंख्येत भर घालणे सुरूच ठेवले. दरम्यान, त्याने आपले शतकही पूर्ण केले. जाफरने आपल्या खेळीत १६ चौकार व एक षटकार लगावला. त्याला तनुष कोटियनची (५८ चेंडूंत नाबाद ४३) चांगली साथ मिळाली. त्यामुळे मुंबईला आघाडी घेता आली. तिसऱ्या दिवशी मुंबईचा भर आघाडीत आणखी भर घालण्याचा असेल. आंध्रकडून केव्ही ससिकांथ (३/५०) व शोएब मोहम्मद खान (२/७०) यांनी गोलंदाजीत चमक दाखवली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy 2023 jaffer comes to mumbai s rescue with a timely century zws