Andy Flower appointed as RCB head coach: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदासाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या १६ हंगामात संघाला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. गेल्या मोसमात हा संघ प्लेऑफसाठीही पात्र ठरू शकला नव्हता. याचा ठपका मुख्य प्रशिक्षक संजय बांगर आणि संघ संचालक माईक हेसन यांच्यावर आहे. आरसीबी फ्रँचायझीने हेसन आणि बांगर यांना बडतर्फ केले आहे. झिम्बाब्वेचे माजी खेळाडू आणि लखनौ सुपर जायंट्सचे मागील मोसमाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अँडी फ्लॉवर नुकतेच लखनौ सुपरजायंट्स मुख्य प्रशिक्षकपदावरुन पायउतार झाले होते. त्यांच्या जागी जस्टिन लँगर लखनऊचे मुख्य प्रशिक्षक बनले. अशा परिस्थितीत अँडीला आता आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. अँडी फ्लॉवरचे स्वागत करताना आरसीबीने सोशल एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहले की, “आम्ही आयसीसी हॉल ऑफ फेमर आणि इंग्लंडचे टी-२० विश्वचषक विजेते प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांचे स्वागत करतो. आयपीएल आणि जगभरातील अनेक टी-२० संघांना प्रशिक्षण देण्याचा आणि पीएसएल, आयएलटी-२०, द हंड्रेड आणि अबू धाबी टी-१० मध्ये त्याच्या संघांना विजेतेपद मिळवून देण्याचा अँडीचा अनुभव आरसीबीला विजेतेपद मिळवून देऊ शकतो. त्यांची विजयी मानसिकता आरसीबीला पुढे जाण्यास मदत करेल.”

आरसीबीने हेसन आणि बांगरचा निरोप घेतला –

आरसीबीने हेसन आणि बांगरसाठी देखील पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले, “टीम डायरेक्टर म्हणून माईक हेसन आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांनी केलेल्या प्रशंसनीय कामाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांची व्यावसायिकता आणि कामाची नैतिकता नेहमीच पाहिली जाते. गेल्या चार वर्षांत त्यांनी अनेक तरुणांना शिकवून यशस्वी होण्यासाठी व्यासपीठ दिले आहे. आता तो आणि संघ वेगळे होत असताना, आम्ही संजय आणि हेसन यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.”

हेही वाचा – IND vs WI 1st T20: मुकेश कुमारने रचला इतिहास, ‘हा’ कारनामा करणारा ठरला भारताचा दुसरा खेळाडू

बांगर आणि हेसन २०२० पासून आरसीबी संघाशी संबंधित आहेत. २०२० आणि २०२१ मध्ये जिथे संघ चौथ्या स्थानावर होता. त्याच वेळी, २०२२ मध्ये, आरसीबीने तिसरे स्थान मिळविले. २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. आता अँडी फ्लॉवरवर संघाला प्रथमच चॅम्पियन बनविण्याची तसेच योग्य प्लेइंग इलेव्हन निवडण्याची जबाबदारी असेल. फ्लॉवरला कोचिंगचा खूप अनुभव आहे. मात्र, व्यवस्थापनात बदल झाल्यास कर्णधारपदातही बदल होणार का, हे पाहायचे आहे. फॅफ डुप्लेसिस कर्णधारपदी कायम राहतील. तसेच, यंदा आरसीबी संघ कोणत्या खेळाडूंना सोडतो याकडे लक्ष असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rcb has appointed andy flower as the head coach to replace sanjay bangar vbm