Nathan Lyon angry on Kevin Pietersen: अॅशेस मालिका २०२३ मधील दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. त्याचवेळी खराब कामगिरीमुळे या मालिकेत इंग्लंडच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन लायनला दुखापत झाल्याने त्याच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाली होती.मात्र, चौथ्या दिवशी या सामन्यात फलंदाजीला उतरून नॅथन लायनने सर्वांनाच चकित केले. त्यानंतर नॅथन लायन माजी खेळाडू केविन पीटरसनवर संतापलेला दिसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॅथन लायनला दुखापत होऊनही तो संघाच्या हितासाठी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. लायनच्या पायाला दुखापत झाली होती, त्यानंतर तो नीट चालू शकत नव्हता. पण ऑस्ट्रेलियाच्या महान गोलंदाजाच्या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले.

केविन पीटरसनने नॅथन लायनच्या फलंदाजीबाबत मोठे वक्तव्य केले –

मात्र, याचदरम्यान इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने मोठे वक्तव्य केले आहे. खरेतर, जेव्हा नॅथन लायन फलंदाजीला आला, तेव्हा समालोचन करणाऱ्या केविन पीटरसनने विचारले, कल्पना करा की त्याला (लायन) डोक्याला मार लागला आणि जखमी झाला, तर ऑस्ट्रेलियाला त्याच्या जागी टॉड मर्फीला फिरकीपटू म्हणून मिळेल. त्याने भारतात खूप चांगली कामगिरी केली आहे.

केविन पीटरसनच्या या प्रश्नावर नॅथन लायन भडकला आणि त्याने फिलिप ह्युजेसच्या घटनेची आठवण करून दिली. तो म्हणाला की, “मी ऐकले आहे की, मी फक्त डोक्याला लागण्यासाठी क्रीझवर गेलो होतो, परंतु मी खरचं याच्या विरोधात आहे. डोक्याला दुखापत झाल्यामुळे मी एका साथीदाराला गमावले आहे. त्यामुळे मला वाटते की या खरोखरच बकवास गोष्टी आहेत.”

हेही वाचा – Team India: सौरव गांगुलीने ‘या’ खेळाडूला संधी देण्याची केली मागणी; म्हणाला, ‘तो सतत चांगली कामगिरी करतोय’

आपले म्हणणे पुढे चालू ठेवत नॅथन पुढे म्हणाला की, “मला धोक्याची जाणीव आहे. पण मी माझ्या संघासाठी काहीही करू शकतो. अॅशेस मालिकेत १५ धावांची भागीदारी किती महत्त्वाची असू शकते हे तुम्हाला माहीत नाही. मी मैदानावर जाऊन खेळलो याचा मला स्वत:ला खूप अभिमान आहे. मला माझ्या संघासाठी हे पुन्हा पुन्हा करायला आवडेल. माझे संघावर प्रेम आहे. मला ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळायला आवडते. माझ्या खेळामुळे माझ्या संघाला मदत होत असेल तर मी ते नक्कीच करेन.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responding to a question from kevin pietersen nathan lyon said he aware of danger but i can do anything for my team vbm