Sourav Ganguly Demands BCCI To Give Chance To Leg Spinners: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ यंदा भारतात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने एक मोठं वक्तव्य केलं आहे. गांगुलीच्या मते, टीम इंडियाला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी लेग-स्पिनरचा समावेश करावा लागेल. त्यामुळे युजवेंद्र चहलचे वनडे आणि टी-२० फॉरमॅटमधील सातत्य लक्षात घेता थिंक टँकने त्याच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधली पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. स्पर्धेपूर्वी अनेक तज्ञ भारतीय संघाबाबत मत मांडत आहेत. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू गांगुलीने सेटअपमध्ये लेग-स्पिनर असण्याबाबत आपली भूमिका व्यक्त केली आहे. कारण टीम इंडियाकडे फिंगर-स्पिनर्सच्या बाबतीत विविध पर्याय आहेत. तो पुढे म्हणाला की, इतर संघांपेक्षा आघाडी मिळवण्यासाठी व्यवस्थापनाला संघातील युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या खेळाडूंचा विचार करावा लागेल.

Kevin Pietersen's big statement on Sanju Samson
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य
Irfan Pathan Picks 15 Man Squad
Team India : इरफान पठाणने टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंची केली निवड, हार्दिक पंड्यासमोर ठेवली ‘ही’ अट
Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य
Virender Sehwag Says Yuzvendra Chahal's brilliant bowling
IPL 2024 : वीरेंद्र सेहवागला राजस्थानच्या ‘या’ खेळाडूला विश्वचषक खेळताना पाहायचंय; म्हणाला, “तो टी-२० क्रिकेटचा महान…”

सौरव गांगुली काय म्हणाला?

स्टार स्पोर्ट्सवरील चर्चेदरम्यान सौरव गांगुली म्हणाला, “मला वाटते की, या विश्वचषकासाठी भारताला मनगटी स्पिनर शोधण्याची गरज आहे. जडेजा आहे, रविचंद्रन अश्विन आहे, अक्षर पटेल आहे, जो माझ्या मते एक अपवादात्मक अष्टपैलू खेळाडू आहे. रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव देखील आहेत, पण चहल कसा तरी मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडतो. २० षटके असो किंवा ५० षटके असो, छोट्या फॉरमॅटमध्ये तो अत्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याच्यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे.”

हेही वाचा – Saeed Ajmal: हरभजन आणि आश्विनच्या बॉलिंग ॲक्शनबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूच मोठं वक्तव्य; म्हणाला, “त्यांची मेडिकल कंडीशन…”

चहलला २०२२ च्या विश्वचषकात मिळाले नव्हते स्थान –

२०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत, चहलने आठ सामने खेळले आणि मेन इन ब्लूसाठी १२ विकेट घेतल्या होत्या. तथापि, २०२१ च्या विश्वचषकात लेग स्पिनर्स प्रभावी ठरले नव्हते. त्यामुळे पुढील टी-२० विश्वचषकात भारतीय संघात लेग स्पिनर्स दिसले नाहीत. अशा परिस्थितीत गांगुलीने त्यांना सेटअपमध्ये परत आणण्याची मागणी केली आहे.