rest of India in strong position against saurashtra in irani trophy 2022 zws 70 | Loksatta

इराणी चषक क्रिकेट स्पर्धा : शेष भारताची पकड मजबूत ; पिछाडीनंतर सौराष्ट्रची दुसऱ्या डावातही पडझड

सौरभ कुमारने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे शेष भारत संघाने सौराष्ट्रविरुद्ध इराणी चषकाच्या सामन्यावरील पकड मजबूत केली आहे.

इराणी चषक क्रिकेट स्पर्धा : शेष भारताची पकड मजबूत ; पिछाडीनंतर सौराष्ट्रची दुसऱ्या डावातही पडझड
सौरभ कुमार

राजकोट : सर्फराज खानच्या खेळीनंतर सौरभ कुमारने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे शेष भारत संघाने सौराष्ट्रविरुद्ध इराणी चषकाच्या सामन्यावरील पकड मजबूत केली आहे.

पहिल्या डावात २७२ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर सौराष्ट्रची दुसऱ्या डावातही सुरुवात खराब झाली. दुसऱ्या दिवसअखेर सौराष्ट्रची २ बाद ४९ अशी स्थिती होती आणि ते अजून २२७ धावांनी पिछाडीवर होते. चिराग जानी ३, तर धर्मेद्रसिंह जडेजा ८ धावांवर खेळत होता. सौराष्ट्रच्या हार्विक देसाई (२०) आणि स्नेल पटेल (१६) या सलामीच्या जोडीला सौरभ कुमारने माघारी पाठवले. सौरभने चार निर्धाव षटके टाकली.

तत्पूर्वी, पहिल्या दिवशी शतकी खेळी करणारा सर्फराज दुसऱ्या दिवशी धावसंख्येत फारशी भर घालू शकला नाही. तो १७८ चेंडूंत १३८ धावा करून बाद झाला. त्यानंतर सौरभने फलंदाजीत चमक दाखवताना १० चौकारांसह ७८ चेंडूंत ५५ धावांची खेळी केली. सौरभने जयंत यादवच्या (३७) साथीने सातव्या गडय़ासाठी ७१ धावा जोडल्या. अखेर शेष भारताचा पहिला डाव ३७४ धावसंख्येवर संपुष्टात आला. 

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र (पहिला डाव) : ९८

शेष भारत (पहिला डाव) : ११० षटकांत सर्वबाद ३७४ (सर्फराज खान १३८, हनुमा विहारी ८२, सौरभ कुमार ५५; चेतन सकारिया ५/९३)

सौराष्ट्र (दुसरा डाव) : १७ षटकांत २ बाद ४९ (हार्विक देसाई २०; सौरभ कुमार २/०)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा :  स्केटिंगमध्ये महाराष्ट्राला सांघिक सुवर्ण

संबंधित बातम्या

IND vs BAN: न्यूझीलंडहून परतणारे टीम इंडियाचे खेळाडू खराब व्यवस्थेचे बळी; दीपक चहरने केली तक्रार, जाणून घ्या प्रकरण
FIFA World Cup 2022: आजपासून सुपर-१६ लढतींचा थरार, पाहा सर्व सामन्यांचे वेळापत्रक
IND vs BAN: वनडे मालिकेसाठी मोहम्मद शमीच्या बदली खेळाडूची घोषणा, ‘या’ गोलंदाजाला मिळाली संधी
‘संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन’! पाकिस्तानच्या रावलपिंडी मैदानात जो रूटने असं काही केलं…; Video होतोय तुफान Viral
विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये मोरोक्को, जपान बलाढ्य युरोपिय देशांपुढे आपापल्या गटांत अव्वल कसे राहिले?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“…म्हणून मोदी-शहांनी मला मुख्यमंत्री पदाची संधी दिली”; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण
मुंबईमधील रिक्षाचालकाने चक्क ऐकवली युरोपीय देशांची यादी; Viral Video पाहून नेटकरीही झाले अवाक
‘फू बाई फू’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अवघ्या महिन्याभरात कार्यक्रम संपण्याचं कारण आलं समोर
खराब कोलेस्ट्रॉल शरीरातून पूर्णपणे काढून टाकेल ‘या’ ५ गोष्टींचे मिश्रण; वेळीच जाणून घ्या
Tik Tok स्टार मेघा ठाकूरचं निधन, सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टमुळं अवघ्या कलाविश्वात शोककळा