Rinku Singh Match Highlights: २१ चेंडूत ४८ धावांनी कोलकाता नाइट रायडर्सला स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय विजय मिळवून देत रिंकू सिंगने आयपीएलच्या इतिहासात आपले नाव कायमचे कोरले. पाच चेंडूत विजयासाठी २८ धावांची गरज असताना, कोणीही त्याला संधी दिली नाही, तेव्हा डावखुऱ्या फलंदाजाने डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या चेंडूवर सलग पाच षटकार ठोकले. रिंकूच्या षटकातील पाचव्या आणि शेवटच्या षटकाराने केकेआरच्या डगआउटमध्ये उत्साह संचारला. पण रिंकू डगआऊटकडे धावत असताना आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत हा क्षण साजरा करत असताना, रोहन गावस्करच्या एका कमेंटने मात्र फॅन्स पूर्ण नाराज झाले आहेत. हा क्षण विजयाचा, रिंकूचा होता पण यावेळेस गावस्करने दयाळने किती खराब गोलंदाजी केली हे सांगितले.

रोहन गावस्कर म्हणाला की, “हा बॉलरचा खेळ आहे कारण इथे गोलंदाजाने पूर्णपणे संधीचा गदी बेकार कचरा केला आहे. आता आपण रिंकू सिंग किती चांगली फलंदाजी करतोय याबद्दल बोलत आहोत. जर एखादा फलंदाज १२० च्या स्ट्राइक-रेटने एक धाव, एक-बॉल खेळला तरी त्यावर आपण टीका करतो. इथे एक गोलंदाज ३१ धावा देतो त्याचं काय, रिंकूच्या खेळाचे कौतुक आहे पण म्हणूनच मी म्हणतो की हा गोलंदाजांचा खेळ आहे. “

दरम्यान, गावस्करच्या ऑन-एअर कमेंटचे सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली आणि काहींनी त्यांना आयपीएल कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकावे अशी मागणी केली.

हे ही वाचा<< IPL 2023 KKR vs GT: शाहरुख खानलाही पडली रिंकू सिंगच्या खेळीची भुरळ! सामना जिंकल्यानंतर ‘किंग खान’ने असे दिले ‘रिटर्न गिफ्ट’

दुसरीकडे, रिंकूच्या तुफान फटकेबाजीने कार्लोस ब्रॅथवेटने आयसीसी वर्ल्डकप टी २० च्या २०१६ च्या फायनलमध्ये बेन स्टोक्सच्या समोर मारलेले चार षटकार आणि IPL २०२० मधील राजस्थान रॉयल्ससाठी राहुल तेवतियाने मारलेल्या पाच षटकारांच्या आठवणी ताज्या झाल्या. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून समोर येत आहेत.