Rinku Singh Engagement Date Reveal: भारतीय क्रिकेट संघाचा फिनिशर रिंकू सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिंकू सिंह जूनमध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आयपीएल २०२५ मधील रिंकू सिंहचा संघ कोलकाता नाईट रायडर्स लीग स्टेजमध्येच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. यानंतर आता जून महिन्यात रिंकूचा साखरपुडा होणार आहे. रिंकूचा साखरपुडा राजकारणात सक्रिय असणाऱ्या खासदारशी होणार आहे.
भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि मच्छलीशहरच्या खासदार प्रिया सरोज पुन्हा एकदा चर्चेत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांच्या लग्नाची बोलणी झाली होती आणि आता लवकरच दोघांचा साखरपुडा होणार आहे. रिंकू सिंग आणि प्रिया सरोज लवकरच लग्नबंधनातही अडकणार आहेत. या जोडप्याच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे आणि आता साखरपुडा आणि लग्नाच्या तारखा देखील निश्चित झाल्या आहेत. या भव्य समारंभाला राजकारणी, सेलिब्रिटी आणि उद्योगपती उपस्थित असतील.
मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा ८ जूनला रविवारी साखरपुडा होणार आहे. हा साखरपुडा लखनौमधील हॉटेमध्ये पार पडेल. यासह रिंकू सिंह आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज १८ नोव्हेंबर रोजी लग्न करणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
जानेवारीमध्ये, केरकत येथील सपा आमदार आणि प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबाने रिंकू सिंहच्या वडिलांशी अलीगडमध्ये त्यांच्या मुलांच्या लग्नाबद्दल चर्चा केली. त्यांच्या मते, दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली आहे.
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज दोघेही एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखतात. प्रियाच्या एका मैत्रिणीचे वडील एक क्रिकेटपटू आहेत, जे रिंकूला देखील ओळखतात. त्यांच्यामुळेच या दोघांची भेट झाली आणि त्यांची ओळख वाढली.
कोण आहे रिंकू सिंहची होणारी पत्नी प्रिया सरोज?
रिंकू सिंगची होणारी पत्नी प्रिया सरोज ही समाजवादी पक्षाची खासदार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी मच्छलीशहर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यांनी बीपी सरोज यांचा ३५८५० मतांनी पराभव केला. प्रिया पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आली आहे आणि सध्या ती सर्वात तरुण खासदार आहे.
प्रियाचा जन्मउत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. तिने नवी दिल्लीतील एअर फोर्स गोल्डन ज्युबिली इन्स्टिट्यूटमधून आपले शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. त्यानंतर तिने नोएडातील अॅमिटी विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले.