भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सुरु असलेल्या दिवसरात्र कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या डावाच्यावेळी १२व्या शतकात असे काही घडले ज्यावर ऋषभ पंतसोडून कोणाचाही विश्वास बसत नव्हता. इतकेच नाही तर रोहित शर्माला सुद्धा याबाबत खात्री नव्हती. ऋषभने अनेकदा रोहितला समजावल्यानंतर रोहित डीआरएस घ्यायला तयार झाला. यानंतर जो निर्णय आला तो सर्वांसाठी आश्चर्यकारक होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या डीआरएसनंतर श्रीलंकेचा फलंदाज धनंजय डी सिल्वाला आऊट व्हावे लागले. हा निर्णय सर्वांसाठीच आश्चर्यकारक होता. मोहम्मद शमी १२व्या शतकाची शेवटची गोलंदाजी करत होता. धनंजय डी सिल्वाच्या पॅडवर चेंडू लागला आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत जोरदार अपील करू लागला. शमीला विश्वास नव्हता तरी डीआरएस घ्यावा अशी पंतची इच्छा होती. त्याने रोहितलाही समजावण्याचा प्रयत्न केला. रोहितला वाटले की चेंडू पॅडवर आदळून स्टंप बाहेर पडला असावा.

तुम्हालाही खूप तहान लागते का? असू शकते ‘या’ गंभीर आजाराचे लक्षण

दरम्यान, पंत मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम होता. दुसरीकडे शमीलाही विश्वास नव्हता. डीआरएस घेण्याची वेळ संपत येत होती. रोहित शर्माने शेवटच्या क्षणी डीआरएस घेतला. त्यानंतर जे घडले ते थक्क करणारे होते. चेंडू पॅडच्या वरच्या भागाला लागला, पण तो लेग-स्टंपवरून उडताना दिसत होता. फील्ड अंपायर नितीन मेनन यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. सिल्वा २४ चेंडूत १० धावा करून बाद झाला.

पंतचा हा सल्ला भारतीय संघाला खूपच फायदेशीर ठरला. रोहित शर्माने ऋषभ पंतच्या सांगण्यावरून डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला आणि थर्ड अंपायरने सिल्वाला आऊट करार दिला. यानंतर संपूर्ण संघ जल्लोष करू लागला. यादरम्यान रविचंद्रन अश्विनने मोहम्मद शमीच्या डोक्यावर तबला वाजवण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे.

Video : इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींना आधार देणाऱ्या त्रिवेणी आचार्य । गोष्ट असामान्यांची: भाग १९

मॅचबद्दल बोलायचं झालं तर, फलंदाजी करणे कठीण असलेल्या खेळपट्टीवर श्रेयस अय्यरच्या मोठ्या अर्धशतकानंतर, जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताच्या २५२ धावांवर श्रीलंकेने दिवस-रात्र क्रिकेटच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या दिवशी ६ बाद ८६ धावा केल्या. सामन्याच्या पहिल्या दिवशी १६ विकेट पडल्या, जो दिवस-रात्र कसोटीत एका दिवसात सर्वाधिक बळी घेण्याचा नवा विक्रम आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant request rohit sharma drs ashwin did with mohammad shami after the result pvp