आयपीएल २०२१ स्पर्धेत मुंबई इंडियन्स प्लेऑफमधील स्थान अजून निश्चित नाही. राजस्थान आणि कोलकाता सामन्यावर मुंबईचं भवितव्य अवलंबून आहे. एकीकडे मुंबईकर फॅन्सना संघाची चिंता असताना कर्णधार रोहित शर्माने दिग्गज क्रिकेटपटूंची केलेली नक्कल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. रोहित शर्माने तीन क्रिकेटपटूंची हुबेहुब नक्कल केली आहे. मुंबई इंडियन्सच्या सरावा दरम्यान त्याने तीन खेळाडूंची नक्कल केली. रोहित शर्माने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रोहित शर्माने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेला जयवर्धने आणि हरभजन सिंग यांची नक्कल केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. “मित्रांनो … टीममेट्स … लिजेंड्स! आपण या रीलमधील सर्व 3 क्रिकेटपटूंचा अंदाज लावू शकता का? ते पाहूया. दुसऱ्या भागासाठी आमच्याशी कनेक्ट रहा.”, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. त्याचबरोबर काही जणांनी याला अचूक उत्तरं दिली आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि फिरकीपटू हरभजन सिंह मुंबई संघात होते. तर श्रीलंकेच्या जयवर्धने कॅश रिच लीगमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. रोहित शर्माच्या व्हायरल व्हिडिओवर पृथ्वी शॉ आणि राशीद खान यांनी कमेंट्स केल्या आहेत.

रोहितचा पराक्रम

टी-२० क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या सामन्यापूर्वी त्याच्या खात्यात ३९८ षटकार होते. राजस्थानविरुद्ध त्याने १३ चेंडूत २२ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. भारताच्या इतर खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर सुरेश रैना ३२५ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने १०४२ षटकार ठोकले आहेत. १००० पेक्षा जास्त षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma imitates three veteran cricketers rmt