Truth Behind Fatty Rohit Sharma Viral Image: भारतीय संघाने टी-२० विश्वचषकापूर्वीच्या पहिल्या सराव सामन्यात बांगलादेशचा ६० धावांनी मोठा पराभव केला. न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवरील हा सराव सामना जिंकत भारताने वर्ल्डकपच्या तयारीला अंतिम रूप दिले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी शानदार फलंदाजी केली, तर अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे गोलंदाजीत चमकले. विराट कोहलीने सामन्याच्या काही तास आधी न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. तर पंत १८ महिन्यांनंतर भारताकडून प्रथमच खेळत होता, ज्यात त्याने विस्फोटक फलंदाजी केली.
ऋषभ पंतने ३२ चेंडूत ५३ धावांची खेळी खेळली. दुसरीकडे, हार्दिकने आपल्या फॉर्मबद्दल सुरू असलेल्या चर्चांना २३ चेंडूत नाबाद ४० धावा करत चोख उत्तर दिले. बांगलादेश भारताने दिलेल्या १८३ धावांचा पाठलाग करतानाचा कर्णधार रोहित शर्माचा मैदानावरील एका फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. फोटोमध्ये रोहितचं सुटलेलं पोट दिसत आहे, तर फोटोच्या कॅप्शनने भारतीय संघाच्या कर्णधाराच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित शर्मा फिल्डिंग सेट करत असतानाचा त्याचा हा फोटो आहे. रोहित शर्माचं सुटलेलं पोट पाहून त्याच्या फिटनेसवर अनेकांनी चिंता व्यक्त केली.
Wah g Wah Fitness of Indian Captain Rohit Sharma pic.twitter.com/ZLZXiIkMJM
— Muhammad Talha (@Muhamma91370307) June 2, 2024
रोहित शर्माच्या व्हायरल फोटोमागचं नेमकं सत्य काय?
काही चाहत्यांनी हा फोटो व्हायरल झाल्यानंतर स्पष्ट केले की काही एक्स वापरकर्त्यांनी रोहितच्या फिटनेसची खिल्ली उडवण्यासाठी हा फोटो फोटोशॉप केला आहे. हा फोटोशॉप असलेला फोटो आहे हे सिध्द करण्यासाठी काही जणांनी रोहितच्या खऱ्या फोटोचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. रोहित शर्माची खिल्ली उडवण्यासाठी जाणूनबुजून हा फोटो एडिट करण्यात आला, जो एका पाकिस्तानी युजरने शेअर केला आहे. त्याच्या एक्स अकाऊंटच्या कव्हर फोटो हा पाकिस्तानी खेळाडू आहे. याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय कर्णधाराच्या चाहत्याने या टी-२० विश्वचषकाच्या जर्सीमधील त्याचा फोटो पोस्ट केला आहे. यावरून रोहितचा हा व्हायरल होत असलेला फोटो खोटा असल्याचे समोर येत आहे.
Captain Rohit Sharma?? pic.twitter.com/oL5pMNmihy
— MI Fans Army™ (@MIFansArmy) May 29, 2024
भारतीय संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान, आयर्लंड, यजमान अमेरिका आणि कॅनडा या देशांसह अ गटात स्थान देण्यात आले आहे. ५ जूनला आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघ वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करेल. ९ जूनला टीम इंडियाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर १२ तारखेला यजमान अमेरिकेविरुद्ध तर भारताचा शेवटचा साखळी सामना १५ जूनला कॅनडाशी होईल.
