Ruturaj Gaikwad said Mahi Bhai taught me what to do when things don't go your way | Loksatta

‘माही भाईने मला शिकवले, जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तेव्हा …’: ऋतुराजचे धोनीबद्दल मन जिंकणारे वक्तव्य

युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडने सीएसके कॅम्पमध्ये थाला धोनीकडून व्यवहाराच्या काही गोष्टी शिकल्याचे स्पष्ट केले.

‘माही भाईने मला शिकवले, जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तेव्हा …’: ऋतुराजचे धोनीबद्दल मन जिंकणारे वक्तव्य
महेंद्रसिंग धोनी आणि ऋतुराज गायकवाड (संग्रहित छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

क्रिकेटच्या इतिहासातील महान कर्णधारांपैकी एक म्हणून महान क्रिकेटपटू एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तिन्ही प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे, रांचीच्या दिग्गजाने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान अंतिम सामना खेळला होता. आता या दिग्गज खेळाडूच्या स्वभावातील एका पैलूचा खुलासा ऋतुराज गायकवाडने केला आहे.

धोनी, जो इंडियन प्रीमियर लीग (IPL) चेन्नई सुपर किंग्स दिग्गजांचा देखील हृदय आहे. तो लीगच्या आगामी हंगामानंतर त्याच्या शानदार टी-२० कारकिर्दीला अलविदा करेल अशी अपेक्षा आहे. त्याच्या रणनीती कौशल्यासाठी ओळखल्या जाणार्‍या, हे उघड गुपित आहे की सीएसके कर्णधाराला संघसहकाऱ्यांसोबत खूप वेळ घालवने आवडत नाही. या अगोदर ही भारताचा माजी सलामीवीर पार्थिव पटेलने एक किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला की, २००८ च्या आयपीएल फायनलमध्ये धोनीने आयोजित केलेली सीएसकेची टीम मीटिंग फक्त २ मिनिटे चालली होती.

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याच्याशी संभाषण करताना, युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडने सीएसके कॅम्पमध्ये थाला धोनीकडून व्यवहाराच्या काही युक्त्या शिकल्याचे स्पष्ट केले. रुतुराज गायकवाड म्हणाला,”सर्व खेळाडूंचा कॅम्पमध्ये खूप छान ताळमेळ बसला आहे. एक सामना गमावल्यानंतर, प्रत्येकजण १०-१५ मिनिटे शांत व्हायचा. पण माही भाई… प्रेझेंटेशनमधून परत आल्यावर, आम्हाला सांगायचे, ‘मुलांनो, आराम करा, हे घडते.”

गायकवाड पुढे म्हणाला, “हे ऐकल्यानंतर तुम्ही थोडे निवांत होता. एमएस धोनीने मला शिकवले की जेव्हा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तेव्हा तटस्थ कसे राहायचे आणि तुम्ही विजयाच्या बाजूने असताना कसे राहायचे. हे दोन्ही महत्त्वाचे आहे.” जगातील सर्वात श्रीमंत टी-२० लीगमध्ये सीएसकेसाठी शानदार कामगिरी केल्यानंतर गायकवाडची भारतीय संघात निवड झाली होती.

ऋतुराज गायकवाडने पहिले आयपीएल शतक झळकावले होते. त्याचबरोबर २०२१ मध्ये स्पर्धेतील सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज म्हणून हंगामाचा शेवट केला होता. भारतीय सलामीवीराने आयपीएल २०२१ मध्ये सीएसकेसाठी ६३५ धावा केल्यानंतर प्रतिष्ठित ऑरेंज कॅप जिंकली. तसेत धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने २०२१ मध्ये चौथे आयपीएल विजेतेपद पटकावले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 12:43 IST
Next Story
ODI World Cup 2023: अफगाणिस्तान सह ‘हे’ सात संघ थेट पात्र ठरले, मोठ्या संघांना बसला धक्का