Sachin Tendulkar On IPL Journey Of Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘Scintillating Sachin’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएलमधील खेळावर तसेच क्रिकेटमध्ये भविष्यावर विशेष भाष्य केले आहे. यावेळी सचिनने आपल्या यशामागे कुटुंबाचे कसे पाठबळ होते यावरही खास बातचीत केली. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून आपली पहिली ओव्हर टाकली होती. दुसऱ्याच मॅचमध्ये अर्जुनने एक विकेट सुद्धा घेतली पण नंतर स्पर्धा पुढे जाताना अर्जुनच्या वाट्याला आणखी सामने आलेच नाहीत. यावरून सोशल मीडियावर काही प्रमाणात ट्रोलिंग सुद्धा सुरु होते. आता आयपीएलची सांगता झाल्यावर सचिनने या मुद्द्यावरून आपले मत व्यक्त करत अर्जुन तेंडुलकरला खास सल्ला पण दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन सांगतो की, “मला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला. अजित तेंडुलकर (भाऊ) चा माझ्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. नितीन तेंडुलकर (भाऊ) ने माझ्या वाढदिवसाला माझ्यासाठी पेंटिंग बनवली. माझी आई एलआयसीमध्ये काम करत होती, तर माझे वडील प्राध्यापक होते. त्यांनी त्या त्या वेळेला माझे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आणि मी इतर पालकांना सुद्धा त्यांच्या मुलांना स्वातंत्र्य देण्याची विनंती करतो.”

आपल्या बालपणात आईने व नंतर पत्नीने केलेल्या मेहनतीबद्दल बोलताना सचिन भावुक होत म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मला इतक्या दुखापती झाल्या होत्या की मी दोन्ही पायांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पण, अंजलीने ऑस्ट्रेलियाला येऊन ती शस्त्रक्रिया रद्द केली. या दुखापतींमुळे मी खूप निराश झालो होतो पण अंजलीने माझी काळजी घेतली,” तेंडुलकर पुढे म्हणाला.

अर्जुन तेंडुलकरबद्दल बोलताना सचिन म्हणाला की, जसे वातावरण मी माझ्या घरी अनुभवले तेच वातावरण मी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जेव्हा तुम्ही स्वत:चे कौतुक कराल तेव्हा लोक तुमचे कौतुक करतील. माझे वडील जसे म्हणायचे की आपण फक्त आपल्या खेळाकडे लक्ष द्यायला हवे आणि आता मी अर्जुनला सुद्धा तेच सांगत आहे”.

हे ही वाचा<< सचिन तेंडुलकरने IPL संपताच खरेदी केली महागडी वस्तू; ‘ही’ गोष्ट अजून अंबानींकडेही नाही, पहा किंमत व फीचर्स

सचिन पुढे म्हणाला, “मी खेळातून निवृत्त झाल्यावर प्रसारमाध्यमांनी माझा सत्कार केला. मी पत्रकारांना विनंती केली होती की अर्जुनला क्रिकेटच्या प्रेमात पडू द्या, त्याला त्याचा वेळ घेऊ द्या. पत्रकारांनी त्याला स्वातंत्र्य दिले, त्यामुळे मी आभार मानतो”.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar speaks on arjun tendulkar only getting two match from mumbai indians ipl 2023 sachin gets emotional in event svs
First published on: 04-06-2023 at 11:26 IST