सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकेची सहकारी बेथनी मटेक-सँड्स यांनी डब्ल्यूटीए पोर्सचे टेनिस ग्रां. प्रि. स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत या मोसमातील तिसऱ्या जेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. बिगरमानांकित सानिया-बेथनी जोडीने उपांत्य फेरीत जर्मनीच्या अँजेलिक केर्बर आणि आन्द्रिया पेटकोव्हिच या जोडीचा ६-४, ७-५ असा दोन सेटमध्ये पराभव केला. एक तास आणि ३१ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सानिया-बेथनी जोडीने सहा ब्रेकपॉइंट आपल्याकडे वळवले, तर स्वत:च्या सव्‍‌र्हिसवर नऊ ब्रेकपॉइंट वाचवले. त्यांना अंतिम फेरीत जर्मनीच्या सबिन लिसिकी आणि मोना बार्थेल यांच्याशी लढत द्यावी लागेल. लिसिकी-बार्थेल जोडीने क्रोएशियाच्या दारिजा जुराक आणि कॅटलिन मारोसी जोडीचा ६-३, ६-४ असा सहज पराभव केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saniya bethani in final round