Shahid Afridi criticizes PCB saying why are they refusing to play in Ahmedabad: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यास तीन महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक आहे, परंतु स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेळापत्रकाला उशीर होण्यामागे एक प्रमुख कारण समोर आले आहे. पीसीबीने अजूनही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध साखळी सामना खेळण्यास तयार नाही. हे वेळापत्रकाच्या घोषणेला उशीर होण्याचे मुख्य कारण असल्याचे मानले जाते. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पीसीबीच्या या वृत्तीवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने स्पर्धेचे ड्राफ्ट वेळापत्रक आधीच आयसीसीला पाठवले आहे. जे सर्व संबंधित क्रिकेट बोर्डांनाही त्यांचे मत नोंदवण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रारूप वेळापत्रकानुसार ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून १५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादमध्ये प्रस्तावित आहे, पण पीसीबी भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळण्यास तयार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीचे अधिकारी नुकतेच पाकिस्तानला गेले होते. पीसीबीच्या मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी त्यांना सांगितले आहे की, पाकिस्तानला नॉकआऊट मॅच असल्याशिवाय त्यांचा कोणताही सामना अहमदाबादमध्ये खेळायचा नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, पाकिस्तानचा संघ आपला साखळी सामना अहमदाबादमध्ये खेळण्यास उत्सुक नाही.

हेही वाचा – Salman Butt: “बीसीसीआयने विराट कोहलीला कर्णधारपद…”; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे धक्कादायक विधान

याप्रकरणी शाहिद आफ्रिदीने पीसीबीला फटकारले आहे. क्रिकेट पाकिस्तान डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना आफ्रिदी म्हणाला, “ते अहमदाबादमध्ये खेळण्यास का नकार देत आहेत? ती खेळपट्टी आग ओकते की झपाटलेली आहे?”

जा, खेळा आणि जिंका –

आफ्रिदी पुढे म्हणाला, “जा, खेळा आणि जिंका. जर काही पूर्वनियोजित आव्हाने असतील तर त्यावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जिंकणे. दिवसअखेरीस पाकिस्तान संघ जिंकला हे महत्त्वाचे आहे. सकारात्मक पद्धतीने घ्या. जर ते (भारत) खेळण्यास सोयीस्कर असतील तर तुम्ही जा, खचाखच भरलेल्या भारतीय प्रेक्षकांसमोर जिंका आणि तुम्ही काय साध्य केले ते त्यांना सांगितले पाहिजे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid afridi criticizes pcb saying why are they refusing to play in ahmedabad vbm