भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण सध्या तो सोशल मीडियावर सक्रिय असल्याने चर्चेत असतो. यादरम्यान शिखर धवनने त्याच्या ‘द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोर’ या आत्मचरित्रात काही वैयक्तिक किस्से शेअर केले आहेत. दरम्यान त्याच्या रिलेशनशिपबद्दल आणि त्यादरम्यान रोहित शर्माच्या प्रतिक्रियेबाबत सांगितलं आहे.

२००६ मध्ये भारत अ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान धवनने त्याच्या रिलेशनशिपबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते. धवनने भारतीय संघातून बाहेर धाल्यानंतर एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात धवनने त्याच्या कारकिर्दीतील अनेक प्रसंग सांगितले आहेत. या पुस्तकात, धवनने त्याच्या प्रेयसीला त्याच्या हॉटेलच्या खोलीत गपचूप कसं आणायचा याबद्दलचा जुना किस्से सांगितला आहे.

शिखर धवन जेव्हा टीम इंडियामधून खेळत असे, तेव्हा तो रोहित शर्माबरोबर त्याची खोली शेअर करायचा. यावेळी त्याने खुलासा केला की रोहितला त्याची प्रेयसी त्यांच्या खोलीत येणं अजिबात आवडत नव्हतं. त्याने हे देखील सांगितले की त्यांच्या नात्याची बातमी संपूर्ण संघातील खेळाडूंमध्ये कशी पसरली होती.

धवनने त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे, “ती खूप सुंदर होती आणि मी अचानक पुन्हा प्रेमात पडलो. मी असा विचार केला की ती माझ्यासाठीच बनलेली आहे आणि मी तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार झालो होतो.”

२००६ मध्ये भारत अ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर धवनने उत्कृष्ट कामगिरी केली होती. परंतु त्याने कबूल केलं की तो त्याच्या मैत्रिणीबरोबर जास्त वेळ घालवू लागल्याने तो प्रेमात पडू लागला. जिला तो एलेन असं म्हणत असे.

धवनने किस्सा सांगताना लिहिलंय, “मी सराव सामन्यात अर्धशतकाने सुरुवात केली आणि दौरा चांगला चालला होता. प्रत्येक सामन्यानंतर, मी एलनला भेटायचो आणि मग तिला मी आमच्या हॉटेल रूममध्ये घेऊन जाऊ लागलो, जिथे मी रोहित शर्माबरोबर खोली शेअर करायचो. कधीकधी रोहित हिंदीत तक्रार करायचा, “तू मला झोपू देशील का?” रोहित शर्माला त्याची गर्लफ्रेंड रूममध्ये येणं आवडत नसे आणि त्यामुळे तो वैतागून हे बोलायचा.

संपूर्ण संघाला धवनच्या नात्याबद्दल कळलं जेव्हा भारताच्या टीम सिलेक्टरने त्याला त्याच्या मैत्रिणीसोबत पाहिलं. धवन पुढे म्हणाला की, “एके संध्याकाळी मी एलनबरोबर जेवत होतो आणि ती माझ्या खोलीत असल्याची बातमी संपूर्ण संघात वाऱ्यासारखी पसरली. आमच्यासह दौऱ्यावर असलेल्या एका वरिष्ठ राष्ट्रीय निवडकर्त्याने आम्हाला लॉबीमध्ये हातात हात घालून चालताना पाहिलं. मला त्यावेळी तिचा हात सोडावा असं वाटलं नाही, कारण मी कोणताही गुन्हा करत नव्हतो.” असं धवन पुढे म्हणाला.