IND vs NZ Semi final Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विजयासह अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यानंतर भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिलने प्रतिक्रिया दिली. शुबमन गिल म्हणाला, मला क्रॅम्प्स आले नसतो, तर कदाचित मी शतक झळकावू शकतो. त्याचबरोबर शुबमन म्हणाला, विराट कोहलीची धावांची भूक आणि समर्पण त्याला प्रेरणा देते. तसेच जेव्हा तो कर्णधार रोहित शर्मासोबत क्रीजवर असतो, तेव्हा त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपांत्य फेरीच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर शुबमन गिल आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा भारताला शानदार सुरुवात करुन देण्यात यशस्वी ठरले. मात्र, तीव्र क्रॅम्पमुळे शुबमन गिलला सामन्याच्या मध्यभागी मैदान सोडावे लागले. त्यानंतरही शुबमन गिल फलंदाजीसाठी आला होता, पण त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. शुबमन गिल ८० धावांवर नाबाद राहिला, मात्र तरीही भारताने न्यूझीलंडविरुद्ध ३९७ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

शुबमन गिल दुखापतीबद्दल बोलताना म्हणाला, “याची सुरुवात क्रॅम्प्सने झाली आणि नंतर माझ्या हॅमस्ट्रिंगमध्ये थोडा ताण आला. ते खूप वेदनादायक होते. डेंग्यूनंतरची ही सर्वात वाईट भावना होती. मला क्रॅम्प्स आले नसते, तर मी कदाचित १०० धावा पूर्ण केल्या असत्या. भले मी शतक पूर्ण केले असो किंवा नसो. परंतु मला वाटते की आम्ही ज्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो, तिथे आम्ही पोहोचलो. आम्हाला ४०० च्या आसपास धावा करण्याची अपेक्षा होती. २५व्या आणि ३०व्या षटकापर्यंत आम्ही जितक्या धावा करायला हव्या होत्या, तितक्या धावा आम्ही केल्या. त्यामुळे मी शतक केले किंवा नाही केले या गोष्टीने काही फरक पडत नाही.”

हेही वाचा – IND vs NZ: मोहम्मद शमीच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर आर आश्विनने घेतले त्याच्या हाताचे चुंबन, VIDEO होतोय व्हायरल

कोहली आणि माझ्या फलंदाजीत काही साम्य –

शुबमन गिल म्हणाला की कोहली आणि त्याच्या फलंदाजीत काही साम्य आहे. तो म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्ही क्रीजवर परिस्थिती आणि खेळ कसा पुढे चालवायचा याबद्दल बोलतो. मला वाटते की त्यांच्या आणि माझ्या शैलीत काही साम्य आहे. कारण आम्हा दोघांना स्कोअर बोर्ड चालता ठेवायला आवडते.”

रोहितकडून काहीतरी नवीन शिकायला मिळते –

रोहित शर्मासोबत फलंदाजी करताना काहीतरी नवीन शिकायला मिळते, असेही गिल म्हणाला. तो म्हणाला, ‘त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट मला प्रभावित करते. मी पॉवर प्लेमध्ये एका विद्यार्थ्याप्रमाणे रोहित भाईसोबत उभा असतो. ते १० षटके खेळतात आणि मी फक्त १५ ते २० चेंडू खेळतो. कारण ते येताच त्यांचे काम सुरू करतात. त्यामुळे मी आरामात खेळतो. ते चौकार आणि षटकार मारत असतात आणि मी फक्त त्यांना पाहत असतो..”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill says if i had not cramps maybe might have completed 100 runs against new zealand vbm