आयपीएलमधील राजकोट या फँ्रचायझीने गुजरात लायन्स असे आपल्या संघाचे नामकरण केले असून कर्णधारपदी भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाची निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ब्रॅड हॉज हा संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहे. या वर्षी आयपीएल स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे या कालावधी दरम्यान रंगणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर बंदी घातल्यानंतर इंटेक्स टेक्नोलॉजिस या कंपनीने राजकोटची फ्रँचायझी विकत घेतली होती. त्यानंतर लिलावाच्या वेळी त्यांनी रैनाला प्रथम प्राधान्य दिले होते. रैनाबरोबर या संघात रवींद्र जडेजा, जेम्स फॉकनर आणि ड्वेन ब्राव्हो हे नावाजलेले खेळाडू आहेत. रैनाला संघाचे कर्णधारपद मिळेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. कारण न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमही या संघात आहे. त्याने न्यूझीलंडचे दमदार नेतृत्व केले असून त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडेल, असे काही जणांना वाटत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियावरील विजय मोलाचा
नवी दिल्ली : तुम्ही कोणत्या संघाला पराभूत करता, हे महत्त्वाचे असते. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत पराभूत करणे ही कोणत्याही संघासाठी सोपी गोष्ट नाही. आमच्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मोलाचा असून त्याचा फायदा आम्हाला ट्वेन्टी-२० विश्वचषकात नक्कीच होईल. या विजयानंतर संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. असे मत भारताचा फलंदाज सुरेश रैनाने सांगितले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने एकदिवसीय मालिका गमावली असली तरी ट्वेन्टी-२० मालिकेत त्यांनी यजमानांना ३-० अशी धूळ चारली होती. अटीतटीच्या झालेल्या तिसऱ्या
ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये रैनाने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina to lead gujarat lions in the ipl