Sybrand Engelbrecht and Logan Van Beek broke the record set 40 years ago: आयसीसी विश्वचषक २०२३ चा १९वा सामना नेदरलँड्स आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला आहे. या सामन्यात श्रीलंकेने नेदरलँड्सचा ५ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला. तत्पूर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डच संघाने ४९.४ षटकांत सर्वबाद २६२ धावा केल्या होत्या. दरम्यान या संघाने ९१ धावांत ६ विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर ७व्या क्रमांकाचा फलंदाज सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि ८व्या क्रमांकाचा फलंदाज लोगान व्हॅन बीक यांनी शानदार भागीदारी करत भारताचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दोन फलंदाजांनी दमदार खेळी करत संघाची धावसंख्या २६० च्या पुढे नेली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १३० धावा जोडल्या आणि एकदिवसीय विश्वचषकातील ४० वर्षे जुना विक्रम मोडला. नेदरलँड्स संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून सर्वांनाच चकित केले होते.

१९८३ च्या विश्वचषकातील मोठा विक्रम मोडला –

एकदिवसीय विश्वचषकात सातव्या किंवा त्या खालच्या क्रमावरील विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी यापूर्वी १९८३च्या विश्वचषकात झाली होती. कपिल देव आणि सय्यद किरमाणी यांनी झिम्बाब्वेविरुद्ध १२६ धावा जोडल्या होत्या. त्यानंतर आता ४० वर्षांनंतर २०२३ मध्ये नेदरलँडच्या जोडीने हा विक्रम मोडला आहे. हा विक्रम एखाद्या सहयोगी राष्ट्रातील जोडी मोडेल, असे क्वचितच कोणाला वाटले असेल. सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक या जोडीने आठव्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. या यादीत धोनी आणि जडेजाचीही नावे आहेत. त्यामुळे धोनीलाही मागे टाकले.

हेही वाचा – NED vs SL, World Cup 2023: श्रीलंकेने विश्वचषकात उघडले विजयाचे खाते, नेदरलँड्सचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवत नोंदवला पहिला विजय

एकदिवसीय विश्वचषकात सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमावरील विकेटसाठी मोठी भागीदारी –

१३०- सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगान व्हॅन बीक (नेदरलँड), २०२३
१२६ नाबाद- कपिल देव, सय्यद किरमाणी (भारत), १९८३
११७- इयान बुचार्ट, डेव्ह हॉटन (झिम्बाब्वे), १९८७
११६- एमएस धोनी, रवींद्र जडेजा (भारत), २०१९

सायब्रँडने एमएस धोनीलाही टाकले मागे –

नेदरलँड्सच्या खेळाडूंनी प्रथमच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 7व्या किंवा त्याखालील क्रमांकावर खेळताना दोन खेळाडूंनी ५०हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. याआधी एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी २०१९ साली न्यूझीलंडविरुद्ध हा विक्रम केला होता. याआधी २०१५ मध्ये यूएईच्या अमजद जावेद आणि नासिर अजीज यांनी ही कामगिरी केली होती. १९९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉक आणि लान्स क्लुसनर यांनीही ही कामगिरी केली होती. या सामन्यात नेदरलँड्सच्या सायब्रँडने सातव्या क्रमांकावर ७० धावांची तर व्हॅन बीकने ५९ धावांची खेळी केली होती. धोनीने याआधी गेल्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध सातव्या क्रमांकावर ५० धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sybrand engelbrecht logan van beek breaks world cup partnership record of kapil dev and syed kirmani vbm