ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित टी२० विश्वचषक सामना संततधार पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे आऊटफिल्ड कव्हरने झाकले होते. पाऊस आणि ओले मैदान यामुळे या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. याआधी, शुक्रवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामनाही पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अस्वस्थता असून आता ऍशेस प्रतिस्पर्ध्यांसाठी उपांत्य फेरी गाठणे हे आव्हानात्मक ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी धक्कादायक पराभव झाला होता. आपल्या मोहिमेची खराब सुरुवात झाल्यानंतर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सुपर-१२ च्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून दमदार पुनरागमन केले. अफगाणिस्तानविरुद्ध विजयाने सुरुवात करणाऱ्या इंग्लंडला पावसामुळे मागील सामन्यात आयर्लंडविरुद्ध डकवर्थ लुईस पद्धतीनुसार पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

पाहा काय असतील ग्रुप ए मधील समीकरण

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात नाणेफेकही झाली नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण विभागून देण्यात आला. अशा स्थितीत आता ग्रुप ए मधील उपांत्य फेरीची लढत रंजक बनली आहे. गुणतालिकेत न्यूझीलंड, इंग्लंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचे समान गुण आहेत. मात्र न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांचे नेट रनरेट हे चांगले आहेत.

हेही वाचा :  T20 World Cup: “यापेक्षा मोठी संधी…” कर्णधार अ‍ॅरॉन फिंचचे इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर मोठे वक्तव्य 

न्यूझीलंड दोन सामन्यांत तीन गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यासोबतच इंग्लंडचा संघ तीन सामन्यांतून तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तीन सामन्यांतून तीन गुणांसह आयर्लंड तिसऱ्या स्थानावर आहे आणि ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला नेट रनरेट आहे. त्याचबरोबर गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचेही तीन सामन्यांत तीन गुण असून संघ चौथ्या स्थानावर गेला आहे. श्रीलंकेचे दोन सामन्यांत दोन गुण झाले असून संघ पाचव्या स्थानावर आहे. मात्र, श्रीलंकेचा नेट रनरेट ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि इंग्लंड या तिन्ही संघांपेक्षा चांगला आहे. अशा स्थितीत एक सामना जिंकल्यास श्रीलंकेचा संघ थेट पहिल्या स्थानावर जाईल. याचबरोबर अफगाणिस्तानचा संघ तीन सामन्यांतून दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

हेही वाचा :  T20 World Cup: ‘लाओ भैया दे दो’, सूर्यकुमार यादव सामनावीराच्या पुरस्कारासाठी झाला होता आतुर, पाहा व्हिडिओ 

न्यूझीलंडचा पुढचा सामना २९ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध आहे. हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचेल. न्यूझीलंड संघ जिंकला तर ते पहिल्या स्थानावर कायम राहतील. श्रीलंकेचा संघ जिंकल्यास प्रथम स्थानावर पोहोचेल. तसे पाहायला गेल्यास इंग्लंडची वाट थोडी खडतर आहे तर त्यामानाने ऑस्ट्रेलिया वाट थोडी सोपी आहे. यामागचे कारण म्हणजे इंग्लंडचा पुढचे सामने हे न्यूझीलंड आणि श्रीलंकेशी आहेत आणि ऑस्ट्रेलियाचे हे आयर्लंड आणि अफगाणिस्तान बरोबर आहेत. आगामी काळात आणखी पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे असेन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup england vs australia match called off due to rain draw in group a see what the tie ups will be avw