आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबरपासून अमिराती आणि ओमान येथे होणाऱ्या -२० वर्ल्ड कपमधून सलामीवीर पृथ्वी शॉ, धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर या मुंबईकरांना डावलण्यात आलं आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनाही अनपेक्षित डच्चू मिळाला आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह पंचतारांकित फिरकी माऱ्याची रचना करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी सर्वात सुखद धक्का म्हणजे धोनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी टी-२० वर्ल्ड कपसाठी धोनीची नियुक्ती भारतीय संघासाठी आनंदाची बातमी असल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी डावपेच आखण्यावरुन रवी शास्त्री आणि धोनीमध्ये वादाची ठिणगी पडू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. जर दोघांनीही एकत्रपणे काम केलं तर संघासाठी खूप उपयुक्त ठरेल असं गावसकर यांनी आजतकशी बोलताना म्हटलं आहे.
India T20 World Cup Squad : मुंबईकर श्रेयस, पृथ्वी, शार्दूल यांना डावलले!
“धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ चा वर्ल्ड कप जिंकला आहे आणि त्याआधई २००७ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकलो आहोत. भारताला नक्कीच याचा फायदा होणार आहे,” असं गावसकर म्हणाले आहेत.
सुनील गावसकर यांनी यावेळी २००४ मध्ये आपली सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याचं उदाहरण दिलं. “त्यावेळी मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या जॉन राइट हे थोडे चिंताग्रस्त होते. त्यांना मी त्यांची जागा घेईन असं वाटलं होतं. पण रवी शास्त्री यांना धोनीला प्रशिक्षणात जास्त रस नसल्याची कल्पना आहे. रवी शास्त्री आणि धोनीमधील भागीदारी चांगली झाल्यास भारताला खूप फायदा होईल,” असा विश्वास गावसकरांनी व्यक्त केला आहे.
टी -२० विश्वचषकासाठी मेंटॉर होण्यासाठी धोनी कसा तयार झाला? जय शाह म्हणाले…
“पण जर डावपेचावरुन आणि संघ निवडीवरुन दोघांमध्ये मतांतर झालं तर कदाचित याचा संघावर परिणाम होईल. पण धोनीची निवड ही भारतीय संघाला बळ देणारी आहे. त्याच्याकडे खूप अनुभव असून, बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना त्याच्याइतका मोठा खेळाडू कोणी नव्हता,” असं गावसकर म्हणाले आहेत.
या टीम सिलेक्शनला तुम्ही किती मार्क द्याल?https://t.co/2jrmCKNbWi https://t.co/XpGnaR1xEF < येथे वाचा सविस्तर वृत्त #Sports #SportsNews #Cricket #TeamIndia #T20WorldCup pic.twitter.com/p70UrQGys5
— LoksattaLive (@LoksattaLive) September 9, 2021
“धोनीची निवड ही भारतीय संघासाठी आनंदाची बातमी असली तरी यावरुन वाद होऊ नये अशी मी प्रार्थना करतो. रवी शास्त्री आणि धोनीने एकत्र काम केलं तर भारतासाठी ही मोठी बातमी आहे,” असं गावसकरांनी म्हटलं आहे. गावसकरांनी यावेळी अश्विनला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळेल का याबाबत शंका व्यक्त केली आहे. अश्विन जुला २०१७ पासून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही.