Premium

LLC 2023 : गौतम गंभीरवर टीका करणे श्रीसंतला पडले महागात, एलएलसी आयुक्तांनी बजावली कायदेशीर नोटीस

LLC legal notice to Sreesanth : बुधवारी एलएलसी स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यादरम्यान श्रीसंतने सोशल मीडियावर गौतम गंभीरने त्याला ‘फिक्सर’ म्हटल्याचा दावा केला होता. त्यानंतर एलएलसी आयुक्तांनी श्रीसंतला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Sreesanth claimed that Gautam Gambhir called him fixer
एलएलसीची श्रीसंतला कायदेशीर नोटीस (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

The commissioner of LLC handed Sreesanth a legal notice : लिजेंड्स लीग क्रिकेट २०२३ (एलएलसी २०२३) स्पर्धेतील गौतम गंभीर आणि श्रीसंत यांच्यातील वादाने आता नवे वळण घेतले आहे. टीम इंडियाच्या या दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये बुधवार, ६ डिसेंबर रोजी मैदानावर जोरदार वादावादी झाली. यानंतर श्रीसंतने सोशल मीडियावर गंभीरवर निशाणा साधला. तो इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला आणि म्हणाला की गंभीरने त्याला फिक्सर म्हटले होते. श्रीसंत इथेच थांबला नाही. त्याने गौतम गंभीरच्या एका इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केली आणि बरेच काही सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता अशा बातम्या येत आहेत की, ज्यामुळे टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अडचणीत सापडला आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटने या गोलंदाजाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. जोपर्यंत सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ हटवला जात नाही तोपर्यंत या विषयावर कोणतीही चर्चा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एवढेच नाही, तर पंचांनी दिलेल्या अहवालात श्रीसंतच्या दाव्यासारखे काहीही आढळले नाही.

लिजेंड्स लीग क्रिकेट आयुक्तांनी श्रीसंतला बजावली नोटीस –

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, लिजेंड्स लीग क्रिकेट (एलएलसी) च्या आयुक्तांनी श्रीसंतला कायदेशीर नोटीस बजावली आहे. टी-२० स्पर्धेत खेळताना श्रीसंतने त्याच्या कराराचे उल्लंघन केल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. श्रीसंतने गौतम गंभीरवर टीका करणारे व्हिडीओ काढून टाकले, तरच त्याच्याशी चर्चा सुरू केली जाईल, असेही त्यात म्हटले आहे.

हेही वाचा – AUS vs PAK Test Series: मिचेल जॉन्सनच्या टीकेला डेव्हिड वॉर्नरचे प्रत्युत्तर; म्हणाला, “माझ्या आई-वडिलांनी मला…”

लिजेंड्स लीग क्रिकेटने जारी केले निवेदन –

लिजेंड्स लीग क्रिकेटने (एलएलसी) दोन खेळाडूंमधील वादाबद्दल एक निवेदन जारी केले आणि सांगितले की ते आचारसंहितेच्या उल्लंघनाची अंतर्गत चौकशी करतील. एलएलसीने म्हटले आहे की, “क्रिकेट जगतात चर्चा होत असलेली ही घटना आचारसंहितेचा भंग आहे आणि लीगच्या आचारसंहितेचे आणि आचार समितीने घालून दिलेल्या स्पष्ट नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर आवश्यक कारवाई केली जाईल. एलएलसी क्रिकेट आणि खेळाचा आत्मा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल अंतर्गत तपास करेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह मैदानावर आणि मैदानाबाहेरील कोणत्याही गैरवर्तनास थारा दिला जाणार नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The commissioner of llc handed sreesanth a legal notice after pacer claimed that gautam gambhir called him fixer vbm

First published on: 08-12-2023 at 13:40 IST
Next Story
AUS vs PAK Test Series: मिचेल जॉन्सनच्या टीकेला डेव्हिड वॉर्नरचे प्रत्युत्तर; म्हणाला, “माझ्या आई-वडिलांनी मला…”