David Warner said everyone is entitled to an opinion : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने माजी सहकारी गोलंदाज मिचेल जॉन्सनच्या नुकत्याच केलेल्या टीकात्मक विधानावर मौन सोडले आहे. मिचेल जॉन्सनने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी डेव्हिड वॉर्नरच्या निवडीवरून ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीवर जोरदार टीका केली होती. यावर डेव्हिड वार्नर म्हणाला, त्याला याने काही फरक पडत नाही. डेव्हिड वार्नरच्या मते कोणालाही मत मांडण्याचा अधिकार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका ही वॉर्नरची अंतिम कसोटी असू शकते. यावर जॉन्सन म्हणाला की दिग्गज सलामीवीर त्याला मिळत असलेल्या नायकासारखा निरोप घेण्यास पात्र नाही. कारण तो सँडपेपर घोटाळ्यात सामील होता, ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट समुदाय त्याच्या विरोधात वळला होता. आता या वादाच्या संदर्भात डेव्हिड वॉर्नरने आगीत तेल न घालता शांत प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्नर म्हणाला की, मिचेल जॉन्सनचे शब्द कितीही कठोर असले, तरीही त्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. वॉर्नर पुढे म्हणाला की, जॉन्सनसारख्या टीकाकारांसमोर नतमस्तक व्हायला तो खूप आधी शिकला आहे.

police reaction on Gurucharan Singh missing
गुरुचरण सिंग बेपत्ता असण्याबद्दल पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सीसीटीव्हीत जे दिसतंय त्यानुसार ते…”
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

फॉक्स स्पोर्ट्सच्या अहवालानुसार वॉर्नर म्हणाला, “या उन्हाळ्यात क्रिकेट हेडलाइन्सपासून दूर राहणार नाही. ते असेच आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु आम्ही पुढे जाण्यासाठी चांगल्या कसोटी मालिकेची आशा करतो.” डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, त्याच्या पार्श्वभूमीमुळे तो कठीण क्षणांचा सामना करू शकला आहे. तसेच तो मिचेल जॉन्सनच्या टिप्पण्यांमुळे चिंतित नाही.

हेही वाचा – LLC 2023 : गौतम गंभीरच्या पोस्टवर श्रीसंत संतापला; म्हणाला, ‘तू सर्वोच्च न्यायालयापेक्षा…’

डेव्हिड वार्नर पुढे म्हणाला, “माझ्या आई-वडिलांनी मला टीकेसह जगायल शिकवले. त्याचबरोबर त्यांनी मला रोज लढायला आणि मेहनत करायला शिकवले आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या स्टेजवर जाता, तेव्हा तुम्हाला कळत नाही की त्याच्यासोबत काय-काय येते. तिथे मीडिया असते, खूप टीका होते, पण काही चांगल्या गोष्टीही आहेत. मला वाटते की, आज तुम्ही येथे जे पाहत आहात, ते सर्वात महत्त्वाचे आहे आणि ते म्हणजे लोक क्रिकेटला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत.”