Prime Minister Narendra Modi praising Kylian Mbappé during his visit to France: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ जुलै २०२३ रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. मोदींनी फ्रान्ससोबतच्या त्यांच्या चार दशकांच्या दीर्घकालीन संबंधांबद्दल सांगितले. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी भारतातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या वाढत्या लोकप्रियतेकडेही लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कायलियन एमबाप्पेच्या वाढत्या लोकप्रियतेवर विशेषत: भारतीय चाहत्यांमध्ये प्रकाश टाकला. वृत्तसंस्था एएनआयने पीएम मोदींच्या हवाल्याने म्हटले आहे की, फ्रेंच फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे भारतातील तरुणांमध्ये सुपरहिट आहे. भारतात येऊन त्याची लोकप्रियता बघा…. कायलियन एमबाप्पेचे फ्रान्सपेक्षा भारतात जास्त चाहते आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे म्हणताच सभागृहात उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवल्या. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात स्विस टेनिसपटू रॉजर फेडररचाही उल्लेख केला. एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. खालील व्हिडिओमध्ये, तुम्ही पंतप्रधान मोदींना एमबाप्पेच्या लोकप्रियतेबद्दल बोलताना आणि भारतीय समुदायातील लोक टाळ्या वाजवताना देखील पाहू शकता.

कायलियन एमबाप्पे हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात लोकप्रिय फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाविरुद्धच्या हॅट्ट्रिकने जगभरात त्याच्या लोकप्रियतेत भर पडली. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी भारताचा वेगवान विकासही अधोरेखित केला. जग एका नव्या व्यवस्थेकडे वाटचाल करत असताना भारताची शक्ती आणि भूमिकाही झपाट्याने बदलत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

फ्रान्समधील मार्सेली येथे भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. ते म्हणाले की, युरोपियन देशात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासानंतर पाच वर्षांचा वर्किंग व्हिसा मिळेल.

हेही वाचा – IND vs WI 1st Test: ”करिअरची यशस्वी सुरुवात”; जैस्वालच्या शतकी खेळीचे सचिन तेंडुलकरकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ –

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचे फ्रान्समध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of pm narendra modi praising kylian mbapp during his visit to france vbm