Urvashi Rautela Heart Break: आयसीसी टी २० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. ऋषभ पंतला सुद्धा भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. एकीकडे ऋषभ पंत विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचताच त्याच्या मागोमाग उर्वशी रौतेला हि सुद्धा ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाली आहे. अलीकडेच उर्वशीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या काही फोटोमध्ये चाहत्यांना याविषयी माहिती दिली. ऑस्ट्रेलियात गेलेल्या उर्वशीने शेअर केलेल्या फोटोमधून पुन्हा एकदा तिचा हार्टब्रेक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्वशीच्या पोस्टमध्ये आपण पाहू शकता की तिने “या दरम्यान, ऑस्टेलियात… आणि एक नवा रोमांच सुरु होणार आहे!” असे कॅप्शन लिहीत एक फोटो पोस्ट केला होता. मी माझ्या प्रेमाला फॉलो केलं आणि त्याने मला ऑस्ट्रेलियात आणलं असेही उर्वशी म्हणाली पण तिचा हा अउत्साह व आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण पुढच्याच काही पोस्टमध्ये तिने दुःखी शायरी शेअर करून आपले दुःख चाहत्यांसमोर मांडले आहे.

आधी खुश झाली उर्वशी…

पण क्षणात झाला हार्टब्रेक..

उर्वशीच्या पोस्ट मध्ये आपण पाहू शकता की तिने पांढऱ्या साडीत केस सोडून गुलाबाच्या फुलांमध्ये बसून फोटो काढला आहे. याला कॅप्शन येताना उर्वशी म्हणते “आईना आज फिर रिशवत लेता पकड़ा गया, दिल में दर्द था, और चेहरा हंसता हुआ पकड़ा गया।’ यात तिने हार्ट ब्रेकच्या इमोजीसुद्धा जोडल्या आहेत.

उर्वशी इथेच थांबली नाही तर पुढच्या शायरीमध्ये ती म्हणते, ‘कोई इतना बेदर्द कैसे बन जाए कि किसी की तड़प पर किसी को तरस ही ना आए..!!

आता ऋषभ पंत नुकताच ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर उर्वशी रौतेलाने ऑस्ट्रेलियातच जाऊन हा सगळा प्रकार करणे म्हणजे योगायोग म्हणावा की योजना हे तुम्ही ठरवा .

दरम्यान, २०१८ मध्ये ऋषभ आणि उर्वशी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. दोघांनी कधीही आपल्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. मात्र सोशल मीडियाद्वारे सुरू असलेल्या वादामुळे नक्कीच त्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध होता, अशी चर्चा पुन्हा रंगू लागली. उर्वशीने स्वतःचा बोल्ड लूकमधील व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral urvashi rautela follows love rishabh pant to australia for t 20 world cup now shares sad shayari in white saree photos svs