Virat Kohli-Anushka Sharma kicked out of New Zealand cafe after 4-hour conversation: टीम इंडियाचा रनमशीन विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक झाला आहे. तेथील त्याचे काही व्हीडिओ, फोटो व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरही विराट खूप कमी सक्रिय असतो. पण आता अचानक विराट पुन्हा चर्चेत आला आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जने विराट आणि अनुष्काबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.

भारतीय महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जने अलीकडेच खुलासा केला की विराट आणि अनुष्का यांना न्यूझीलंडमधील एका कॅफेमध्ये जास्त वेळ थांबल्यामुळे तिथून हाकलून लावण्यात आले होते. मॅशेबल इंडियाशी बोलताना तिने हा खुलासा केला. जेमिमाने सांगितलं की तिला आणि स्मृती मानधनाला विराट कोहलीला भेटायचं होतं आणि फलंदाजीकरता सल्ला घ्यायचा होता.

विराट कोहलीकडून फलंदाजीसाठी टिप्स घेण्याकरता स्मृती आणि जेमिमा न्यूझीलंडमधील एका कॅफेमध्ये विराटशी चर्चा करत होते, जिथे अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती. सुरुवातीच्या अर्ध्या तासात खेळाडूंनी क्रिकेटवर चर्चा केली. जेमिमा म्हणाली, “त्याने स्मृती आणि मला सांगितलं की ‘तुमच्याकडे महिला क्रिकेटचं रूप बदलण्याची ताकद आहे आणि मला ते घडताना दिसतंय.”

विराट-अनुष्काला न्यूझीलंडमधील कॅफेमधून का काढलं होतं बाहेर? नेमकं काय घडलेलं?

क्रिकेटवरून त्यांची चर्चा पुढे आयुष्य आणि इतर अनेक विषयांवर सरकली. विराट आणि अनुष्काबरोबर गप्पा जवळपास चार तास रंगल्या. ती म्हणाली, “जणू काही जुने हरवलेले मित्र पुन्हा भेटले आणि गप्पा मारत आहेत अशी ती भावना होती. शेवटी आम्हाला थांबावं लागलं कारण कॅफेच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला बाहेर काढलं.”

जेमिमा आणि स्मृती मानधना विराट आणि अनुष्कासोबत गप्पा मारण्यात मग्न झाल्या. चार तास चाललेल्या या संभाषणात क्रिकेट, जीवन आणि इतर अनेक विषयांवर चर्चा झाली. गप्पा अशा रंगल्या की कॅफेच्या कर्मचाऱ्यांना त्यांना बाहेर काढावं लागलं. या आठवणींना उजाळा देत जेमिमा म्हणाली की हा तिच्यासाठी एक संस्मरणीय अनुभव होता.

दोन मुलांच्या जन्मानंतर विराट आणि अनुष्का लंडनमध्ये स्थायिक झाले. पापाराझी आणि झगमगाटापासून दूर शांत आयुष्य जगायचं होतं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. अनुष्काने २०२४ मध्ये लंडनमध्येच आपल्या दुसऱ्या मुलाला, अकाय कोहलीला जन्म दिला. विराट-अनुष्काचं कुटुंब अनेकदा आपल्या दोन्ही मुलांसह, वामिका आणि अकाय, लंडनच्या रस्त्यांवर फेरफटका मारताना दिसतं.