Who is Richer Virat Kohli or Rohit Sharma: भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुनरागमन करताना दिसून येणार आहेत. १९ ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. दोघांनी कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे दोघेही केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार आहेत. क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच दोघांची तुलना केली जाते. पण मैदानाबाहेर श्रीमंतीच्या बाबतीत नंबर १ कोण आहे? जाणून घ्या.

धावांच्या आणि विक्रमांच्या बाबतीत आघाडीवर असलेला विराट कोहली हा श्रीमंतीच्या बाबतीतही रोहितपेक्षा पुढे आहे. माध्यमातील वृत्तानुसार, विराट कोहलीची एकूण नेटवर्थ ही १०५० कोटी रूपये इतकी आहे. तर रोहित शर्माची एकूण नेटवर्थ ही २१४ ते २३० कोटी रूपयांच्या घरात आहे. ही आकडेवारी जर पाहिली, तर विराटची नेटवर्थ ही रोहितच्या नेटवर्थपेक्षा ५ पट अधिक आहे.

विराटची नेटवर्थ इतकी जास्त कशी?

रोहित शर्माने विराट कोहलीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं होतं. मग विराटची नेटवर्थ त्याच्यापेक्षा जास्त कशी? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर विराट कोहली एक ग्लोबल ब्रँड बनला आहे. आपल्या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ग्रेड ए-प्लसमध्ये स्थान टिकवून ठेवलं आहे. ए-प्लस कॉन्ट्रॅक्ट असणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयकडून ७ कोटी रूपये मानधन दिलं जातं. तर आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्याला २१ कोटी रूपयांमध्ये रिटेन केलं होतं. आयपीएल स्पर्धेतून त्याने जवळपास २०० कोटी रूपयांची बोली केली असल्याची माहिती आहे. यासह अनेक मोठ्या ब्रँड्सचा तो ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. विराटने हॉटेल क्षेत्रात देखील पाऊल ठेवलं आहे. त्याने One8 नावाने हॉटेल सुरू केलं आहे.

रोहित शर्माची नेटवर्थ किती?

रोहित शर्मा कमाईच्या बाबतीत पुढे आहे. पण विराटपेक्षा त्याची नेटवर्थ खूप कमी आहे. रोहित देखील बीसीसीआयच्या ए-प्लस कॉन्ट्रॅक्ट श्रेणीतील खेळाडू आहे. त्यामुळे रोहितला देखील बीसीसीआयकडून ७ कोटी रूपये मानधन दिले जाते. २०२५ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने त्याला १६.३५ कोटी रूपये देऊन रिटेन केलं होतं. आयपीएल स्पर्धेतून रोहितने देखील १५० ते २०० कोटी रूपये कमाई केल्याची माहिती आहे. रोहित देखील अनेक मोठ्या ब्रँड्सचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. पण विराटच्या तुलनेत रोहितची नेटवर्थ कमी आहे.