ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. “जर विराट कोहली आपल्या काळात फलंदाजीसाठी मैदानात उतरला असता तर त्याने माझी सहज धुलाई केली असती.” India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेन वॉर्न बोलत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी आतापर्यंत अनेकदा विराट कोहलीविरुद्ध गोलंदाजी केली आहे, एक-दोन वेळेला मी त्याला बादही केलंय. माझ्या मते वयाच्या 15 व्या वर्षी विराटने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. मला खात्री आहे, जर माझ्या काळात विराट फलंदाजीसाठी मैदानात आला असता तर त्याने माझीही धुलाई केली असती. मी विराटचा मोठा चाहता आहे. क्रिकेटसाठी त्याची निष्ठा ही नक्कीच वाखणण्याजोगी आहे. तो एक उत्तम कर्णधारही आहे.” वॉर्नने कोहलीचं कौतुक केलं.

“टी-20 आणि वन-डे क्रिकेटच्या काळातही विराट कोहली तितक्याच चांगल्या पद्धतीने कसोटी क्रिकेट खेळतो. या कारणासाठी विराटबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एक खेळाडू म्हणून तुमचा खऱ्या अर्थाने कस लागतो”, कोहलीचं कौतुक करताना वॉर्न बोलत होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli would have smashed me around the park says shane warne