Virendra Sehwag Diwali Family Photo: दिवाळी सण साजरा करताना अनेक क्रिकेटपटूंनी चाहत्यांनी शुभेच्छा देत आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान वीरेंद्र सेहवागनेही त्याच्या कुटुंबाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याची आई, दोन्ही मुलगे आहेत. पण त्याची पत्नी या फॅमिली फोटोमध्ये नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

कुटुंबाच्या फोटोमध्ये त्याची पत्नी नसल्याने सेहवागबरोबरच्या त्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चाही गेल्या काही काळापासून सुरू आहेत. पण यावर दोघांपैकी कोणीच स्पष्टपणे वक्तव्य केलेलं नाही.

दिवाळीनिमित्त वीरेंद्र सेहवागने कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे दोन्ही मुलगे आर्यवीर आणि वेदांत आहेत. फोटोमध्ये सेहवागची आई देखील त्यांच्याबरोबर दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सेहवागने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. सेहवागने शेअर केलेल्या फोटोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलेली एक गोष्ट म्हणजे त्याची पत्नी अनुपस्थित होती. दिवाळीसारख्या खास प्रसंगी तिची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला.

फोटोमध्ये पत्नी आरती नसणं हे देखील पती-पत्नी नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या अफवा खऱ्या असल्याचे चाहते म्हणत आहेत. सेहवाग आणि त्याच्या पत्नीमध्ये दुरावा आल्याने दोघे घटस्फोट घेऊ शकतात, अशी चर्चाही माध्यमांमध्ये आली होती. दिवाळीच्या निमित्ताने समोर आलेल्या या फोटोवरून त्यांचं नक्कीच काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्याचं चाहते कमेंटमध्ये म्हणत आहेत.

चाहत्यांनी सेहवागची पत्नी कुठे आहे अशा प्रश्नांनी कमेंट सेक्शन भरून गेलं. काही जणांनी त्याहूनही पुढे जाऊन या जोडप्याच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा खरं असल्याचं म्हटलं. आतापर्यंत, सेहवाग किंवा आरती दोघांनीही या चर्चांबद्दल कोणतंही विधान केलेलं नाही. २००४ मध्ये सेहवाग आणि आरती लग्नबंधनात अडकले होते. सोशल मीडियावर सेहवाग खूप सक्रिय असला तरी त्याने त्याचं वैयक्तिक आयुष्य मात्र खाजगी ठेवलं आहे.

कोणत्याही विश्वासार्ह स्त्रोताने दोघांमधील वादाची अथवा दुरावा आल्याचं निश्चित केलेलं नाही. या दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा अजूनही निराधार आहेत. पण, हा विषय सोशल मिडियावर मात्र चर्चेचा विषय आहे.

आरती सेहवागने दिवाळी निमित्त दोन्ही मुलांबरोबर शेअर केला फोटो

सेहवागने पत्नीशिवाय त्याच्या दोन्ही मुलांबरोबर आणि आईबरोबर फोटो शेअर केला असला तरी, आरती सेहवागने आर्यवीर व वेदांत या दोन्ही लेकांबरोबर तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फोटो पोस्ट केला आहे. दोन्ही मुलांबरोबर आणि नंतर मग आर्यवीरबरोबरचाही सारख्याच कपड्यांमध्ये फोटो शेअर केला आहे.