Asia Cup 2023: श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने स्वतः श्रीलंका क्रिकेट बोर्डाला याची माहिती दिली आहे. हसरंगाने आपल्या निर्णयामागे महत्त्वाचे कारणही दिले आहे. कसोटी क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने श्रीलंकन बोर्डाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “मोठ्या क्रिकेटच्या प्रकारात खेळण्यासाठी माझी तंदुरस्ती अधिक महत्वाची आहे म्हणून मी हा निर्णय घेत आहे.” हसरंगा आयपीएलमध्येही खेळतो. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वानिंदू हसरंगाने कसोटी क्रिकेटला अलविदा केला

श्रीलंकेचा २६ वर्षीय अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला माहिती दिली. त्याचवेळी बोर्डानेही त्यांच्या निर्णयाला मान्यता दिली. हसरंगाच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डी सिल्वा म्हणाले, “आम्ही त्याचा निर्णय स्वीकारू आणि आम्हाला विश्वास आहे की हसरंगा श्रीलंकन कसोटी क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग होता. भविष्यात पुन्हा कधीतरी तो संघाचा भाग नक्की असेल, असा मला विश्वास वाटतो.” निवृत्त होण्यापूर्वी हसरंगाने श्रीलंकेसाठी चार कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने एकूण १९६ धावा केल्या आहेत आणि चार विकेट्सही घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे एक अर्धशतक आहे.

हसरंगाची कसोटी क्रिकेट कारकीर्द अशीच राहिली आहे

हसरंगाने २०१७ मध्ये श्रीलंकन संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून तो श्रीलंकेसाठी चार कसोटी क्रिकेट, ४८ वन डे आणि ५८ टी२० सामने खेळला आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ५.०७च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना ६७ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८३२ धावा आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटने ४ अर्धशतकेही झळकली आहेत. जर टी२० बद्दल बोलायचे तर हसरंगाने ५८ टी२० मध्ये ६.८९च्या इकॉनॉमीसह ९१ विकेट्स घेतल्या आहेत. टी२० मध्ये त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने आतापर्यंत ५३३ धावा केल्या आहेत.

हेही वाचा: Asian Games 2023: “सुवर्णपदक जिंकणे माझे स्वप्न, पण…” भारताला मोठा झटका! ‘या’मुळे विनेश फोगाट मुकणार आशियाई क्रीडा स्पर्धेला

आशिया कप ही स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. यात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भारतासह सहा संघ सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तानसह नेपाळला अ गटात ठेवण्यात आले आहे. ते मुलतानमध्ये स्पर्धेच्या पहिल्या दिवशी यजमानांविरुद्ध पहिला सामना खेळतील आणि ४ सप्टेंबरला भारताविरुद्ध कॅंडी येथे खेळतील.

हेही वाचा: R. Ashwin: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाच्या फलंदाजीबाबत अश्विनने मारला टोमणा; म्हणाला, “आठव्या क्रमांकावर…”

हा कार्यक्रम वन डे फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल आणि आशियाई संघांना भारतात २०२३ होणाऱ्या ICC विश्वचषकापूर्वी तयारी करण्याची ही शेवटची संधी असेल. श्रीलंकाने ही स्पर्धा सहा वेळा जिंकली आहे. त्याचबरोबर नेपाळची ही पहिलीच स्पर्धा असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wanindu hasaranga of sri lanka retired from test cricket know the reason avw