Wankhede Stadium 50th Anniversary Celebration Highlights: क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला आज म्हणजेच १९ जानेवारी रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. वानखेडेच्या पन्नाशीच्या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. याबरोबरचं आज म्हणजे रविवारी वानखेडे स्टेडियममध्ये एक भव्यदिव्य असा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मुंबई क्रिकेट संघाचे तसेच भारतीय क्रिकेटपटू हजर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवधुत गुप्तेच्या मी मराठी, महाराष्ट्र माझा या गाण्यांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले. यानंतर सचिन तेंडुलकरसह खास संवाद साधण्यात आला आणि त्यानंतर सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, डायना इडुलजी या दिग्गजांशी संवाद साधण्यात आला. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा करंडक वानखेडे स्टेडिमयवर आणण्यात आला, याबरोबर सर्व दिग्गजांचा एक फोटो घेण्यात आला. त्यानंतर सुनील गावस्कर यंदा ७५ वर्षांचे होणार आहेत, त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशनही करण्यात आलं. यानंतर एमसीएच्या माजी अध्यक्षांचा आणि शेषराव वानखेडे यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. यानंतर सर्व दिग्गज खेळाडूंनी वानखेडेला फेरफटका मारत चाहत्यांना अभिवादन केलं. याचबरोबर वानखेडे स्टेडियमच्या नव्याकोऱ्या स्टॅम्पचं अनावरण करण्यात आलं. एमसीए आणि बीसीसीआयचे माजी पदाधिकारी श्री. शरद पवार यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांनी भाषण केलं. यानंतर लेझर शो झाला आणि मग अजय-अतुलच्या गाण्यांनी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Live Updates

Happy 50th Anniversary Wankhede Stadium Highlights: वानखेडे स्टेडियम पन्नाशीच्या मुंबईतील कार्यक्रमाचे हायलाईट्स

20:57 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: अजय-अतुल

वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त अजय अतुलच्या गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे.

20:35 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: लेझऱ शो

वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमादरम्यान लेझर शोचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. लेझर शो ला आता सुरूवात झाली आहे.

20:27 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडियम

भारताचे जे खेळाडू वानखेडेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी वानखेडेवर उपस्थित होती, त्यांनी खेळाडूंचा सन्मान केल्यानंतर संपूर्ण वानखेडेवर फेरी मारत चाहत्यांची भेट घेतली.

20:18 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: सन्मान

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माजी अध्यक्षांचाही सन्मान करण्यात आला.

20:05 (IST) 19 Jan 2025
Wankhede Stadium 50th Anniversary: भारताच्या कर्णधारांचा सन्मान

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून वानखेडेच्या पन्नाशीच्या कार्यक्रमादरम्यान मुंबईचे खेळाडू जे भारताचे कर्णधार राहिले आहेत, त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पुष्पगुच्छ आणि वानखेडे स्टेडियमची प्रतिकृती खेळाडूंना देण्यात आली. सर्वप्रथम सुनील गावस्कर, त्यानंतर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, डायना इडुलजी यांचा सन्मान करण्यात आला.

19:52 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडेचा स्वतंत्र स्टॅम्प

वानखेडे स्टेडियमच्या पन्नास वर्षपूर्तीनिमित्त वानखेडेचा एक स्वतंत्र स्टॅम्प सादर करण्यात आला आहे.

19:44 (IST) 19 Jan 2025
Wankhede Stadium 50th Anniversary: सुनील गावस्करांचा वाढदिवस

वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीच्या कार्यक्रमादरम्यान सुनील गावस्करांचा ७५ वा वाढदिवस साजरा केला. सुनील गावस्करांना येत्या १० जुलैमध्ये ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. २०२५ सुरू होताच त्यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. केक कापून आणि बॉलीवूड गायक शेखर रावजियानी याच्या गाण्यासह त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

19:40 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: चॅम्पियन्स ट्रॉफी

वानखेडेच्या पन्नाशीच्या कार्यक्रमात यंदा पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा करंडक आणण्यात आला. या करंडकाबरोबर स्टेजवर उपस्थित भारताच्या दिग्गजांनी फोटोही काढला. याचबरोबर रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू आणि सर्व भारतीयांचा पाठिंबा असेल, असेही सांगितले.

19:16 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडेच्या मैदानावर भारताच्या दिग्गजांबरोबर चर्चा

वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमासाठी स्टेजवर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, डायना इडुलजी, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे या खेळाडूंशी संवाद साधला जात आहे.

19:12 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: सचिन तेंडुलकर

वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीचा कार्यक्रम वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे. सचिन सचिन सचिनच्या आवाजाने संपूर्ण वानखेडे दुमदुमलं आहे. वानखेडेमध्ये स्टेजवर सचिन जातानाचा हा व्हीडिओ आहे.

18:59 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडियम आणि बाळासाहेबांची शिवसेना

बाळासाहेबांच्या एका इशाऱ्यावरून शिवसैनिकांनी एकेकाळी मुंबईतील वानखेडे स्टेडियमचं पिच खोदलं होतं. पण हा नेमका प्रसंग काय आहे वाचा खाली दिलेल्या लिंकवर

Wankhede Stadium: बाळासाहेबांचा इशारा अन् शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच खोदलं, पाकिस्तान बरोबरच्या ‘त्या’ सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं?

18:27 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडेच्या पन्नाशीला चॅम्पियन्स ट्रॉफी हजर

मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीच्या कार्यक्रमाला चॅम्पियन्स ट्रॉफीने वानखेडेवर हजेरी लावली आहे. या ट्रॉफीचा व्हीडिओ एमसीएने शेअर केला आहे.

18:12 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडियम आणि शाहरुख खान

वानखेडे स्टेडिमय आणि शाहरुख खान हा वाद सर्वांनाच माहित आहे. आयपीएल सामन्यातील वादानंतर शाहरूख खानवर वानखेडे स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसरात ५ वर्षे येण्याची बंदी घालण्यात आली होती. काय होतं हे संपूर्ण प्रकरण खाली दिलेल्या लिंकवर वाचा

Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियममध्ये शाहरूख खानवर का घातली होती ५ वर्षांची बंदी? किंग खानने कोणाला केली होती शिवीगाळ?

18:00 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडियम रोमांचक सामने

वानखेडे स्टेडियम अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार राहिला आहे. रवी शास्त्रींचे ६ चेंडूत ६ षटकार, २०११ चा भारताचा वर्ल्ड कप विजय अन् मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवृत्ती… वानखेडेवरील काही ऐतिहासिक प्रसंग पाहा खाली दिलेल्या लिंकवर

Wankhede Stadium : धोनीचा विश्वविजयी षटकार ते फ्लिनटॉफचं शर्टलेस सेलिब्रेशन, ‘हे’ आहेत वानखेडे स्टेडियमवरील पाच रोमांचक सामने

17:33 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडिमयची निर्मिती कशी झाली?

वानखेडे स्टेडियम हे श्री. शेषराव वानखेडे यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून उभं राहिलं आहे. पण या स्टेडियमच्या उभारणीमागचा किस्सा तितकाच रंजक आहे. एका मराठी माणसाच्या अपमानातून हे ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम अवघ्या १३ महिन्यांत उभं राहिलं आहे. संपूर्ण कहाणी वाचा खाली दिलेल्या लिंकवर

Wankhede Stadium Mumbai: मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं वानखेडे स्टेडियम, मुंबईतील ऐतिहासिक स्टेडियमच्या जन्माची रंजक कहाणी
17:27 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: सुनील गावस्कर आणि डियाना इडुलजी

भारताचे दिग्गज आणि माजी खेळाडू सुनील गावस्कर आणि डियाना इडुलजी देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.

17:23 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: दिग्गज क्रिकेटपटू लावणार हजेरी

वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीच्या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट संघाचे मुंबईकर खेळाडू उपस्थित राहणार आहेत. मुंबई क्रिकेट संघाने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा एक फोटो पोस्ट करत खेळाडू उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.

17:21 (IST) 19 Jan 2025

Wankhede Stadium 50th Anniversary: काहीच वेळात सुरू होणार कार्यक्रम

वानखेडे स्टेडियमवर काहीच वेळात हा भव्य दिव्य असा कार्यक्रम सुरू होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांच्या ऑफिशियल सोशल मीडियावरून याचे अपडेट देत आहे.

17:18 (IST) 19 Jan 2025
Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडियमवर होणारे कार्यक्रम

वानखेडे स्टेडियमच्या पन्नाशीनिमित्त या स्टेडियममध्ये आज मुंबई क्रिकेट असोसिएशनने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. वानखेडे स्टेडियममध्ये सुप्रसिध्द मराठी गायक जोडी अजय-अतुल आणि मराठी सुप्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते यांच्या गाण्याचा सुमधुर कार्यक्रम असणार आहे. याशिवाय मुंबईतील क्रिकेटपटू जे पूर्वीपासून वानखेडेवर खेळत मोठे झाले असे भारताचे आजी माजी क्रिकेटपटू हजेरी लावतील. दरम्यान ते त्यांच्या या स्टेडियमवर खेळतानाच्या काही आठवणीही सांगणार आहेत. याशिवाय लेझर शोदेखील होणार आहे.

17:12 (IST) 19 Jan 2025
Wankhede Stadium 50th Anniversary: वानखेडे स्टेडियमची पन्नाशी

मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमला आज म्हणजेच १९ जानेवारी २०२५ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक विविध प्रसंगांचा साक्षीदार असलेलं मुंबईतील हे ऐतिहासिक स्टेडियम आज ५० वर्षांचं झालं. यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशन आठवडाभर अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या अमृत महोत्सवी सोहळ्याची सांगता आजच्या वानखेडेवरील कार्यक्रमाने होईल.

Wankhede Stadium 50th Anniversary Celebration: मुंबईतील सुप्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम वानखेडे स्टेडियमला आज ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडेवर एक भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.