टी-२० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानचा पराभव केल्यापासून क्रीडा क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि चाहते या पराभवानंतर संघ नेमका कुठे चुकला यावर चर्चा करताना दिसत आहेत. पाकिस्तानने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर माजी खेळाडूंमध्येही प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, संघाच्या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी पाकिस्तानमधील A Sports या चॅनेलवर आयोजित चर्चेरदरम्यान एका प्रश्नवार माजी कर्णधार वसीम अक्रम चांगलेच संतापले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अँकर चाहत्यांनी विचारलेले काही प्रश्न मांडत होता. यावेळी एका चाहत्याने पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक मोहम्दम रिझवान याच्यासंबंधी प्रश्न विचारला होता. अँकरने हा प्रश्न विचारताच वसीम अक्रम संतापले आणि उत्तर देण्यास नकार दिला.

विश्लेषण: नेट रन रेटवर पाकिस्तान In की Out ठरणार? पण NRR कॉलमखाली दिसणारा ‘नेट रन रेट’ म्हणजे काय? तो कसा मोजतात?

‘टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इतर कोणताही खेळाडू लीप बाम लावत नसताना मोहम्मद रिझवान मात्र सतत का लावत आहे?’ असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता. यावर वसीम अक्रम म्हणाले “हा काय प्रश्न आहे? यामध्ये क्रिकेटचा काय संबंध? मी या मूर्ख प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही”.

दरम्यान याआधी वसीम अक्रम यांनी ‘टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला कोकेनचं व्यसन लागलं होतं अशी कबुली दिली. आपल्या आत्मचरित्रात आपण याबद्दल खुलासा केला असल्याचं अक्रम यांनी सांगितलंआहे. लवकरच हे आत्मचरित्र प्रकाशित होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim akram gets angry as fan asks why does rizwan wear lip balm sgy