Who is Mystery Girl with Jasprit Bumrah: भारतीय संघ एजबेस्टन कसोटीत इंग्लंडपासून दोन पावलं पुढे आहे. टीम इंडियाने सामन्याच्या सुरूवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारताने पहिल्या डावात ४८७ धावांचा मोठा डोंगर उभारला होता. त्यानंतर हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांच्या ३०० धावांच्या भागीदारीनंतरही इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर सर्वबाद झाला. आता पाचव्या दिवशी भारताने ५०० अधिक धावांची आघाडी मिळवली आहे. पण यादरम्यान भारताच्या ड्रेसिंग रूममधील एक फोटो व्हायरल होत आहे.

भारताचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात वर्कलोड मॅनेजमेंटमुळे खेळत नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज आणि आकाशदीप टीम इंडियासाठी हिरो ठरले. सिराजने ६ विकेट्स तर आकाशदीपने ४ विकेट्स घेतले. बुमराह ड्रेसिंग रूममध्ये बसून यांचं कौतुक करताना दिसला. पण बुमराहचा मिस्ट्री गर्लबरोबरचा ड्रेसिंग रूममधील फोटो व्हायरल होत आहे. ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण, असा सर्वांना प्रश्न पडला आहे.

ड्रेसिंग रूममधील या व्हायरल फोटोमध्ये ही मिस्ट्री गर्ल बुमराहला प्रेमाने न्याहाळताना दिसत आहे. तर बुमराह सामना पाहतोय असं दिसतंय. भारत-इंग्लंड कसोटी सामना असतानाचा हा फोटो आहे. तर या मिस्ट्री गर्लने भारचाच्या इतर कोचिंग स्टाफप्रमाणे भारताची जर्सीदेखील घातली आहे. त्यामुळे भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये अचानक ही मिस्ट्री गर्ल का आली, याचं उत्तर मिळालं आहे.

पहिल्या डावात इंग्लंडच्या डावातील २६ व्या षटकानंतरचा हा फोटो आहे. भारताच्या ड्रेसिंग रूममधील या मिस्ट्री गर्लचं नाव यास्मिन बदियानी असल्याचं उघड झालं आहे. यास्मिन ही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या ऑपरेशन्स विभागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाशी समन्वय साधण्यासाठी तिची विशेष नियुक्ती केली आहे. त्यामुळेच यास्मीन भारताच्या ट्रेनिंग जर्सीमध्ये दिसली.

ट्रेनिंगचं शेड्युलिंग, लॉजिस्टिक्स आणि इतर गोष्टींचं व्यवस्थापन करणं हा यास्मीनच्या कामाचा भाग आहे. यास्मीनच्या लिंक्डन प्रोफाईलवरील माहितीनुसार, ती यापूर्वी फिझ लिमिटेड आणि ओआरएस स्पोर्ट्स यासारख्या कंपन्यांमध्ये हेड ऑफ स्पोर्ट्स पदावर कार्यरत होती. तसेच लेस्टर सिटी या प्रसिद्ध फुटबॉल क्लबमध्ये स्पोर्ट्स फिजिओथेरिपिस्ट म्हणून २०१० ते २०१३ यादरम्यान कार्यरत होती.