Who is Nupur Kashyap Haramnpreet Kaur Friend: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने महिला विश्वचषक २०२५चं जेतेपद पटकावलं. वर्षानुवर्षे सुरू असलेला जेतेपदाचा दुष्काळ संपवत भारताच्या महिला संघाने पहिला विश्वचषक आपल्या नावे केला. यासह कपिल देव, एम एस धोनी नंतर भारताला वनडे विश्वचषक जिंकून देणारी हरमनप्रीत तिसरी तर पहिली महिला कर्णधार ठरली. पण या विजयानंतर आता कर्णधार हरमनप्रीत कौर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
हरमनप्रीत कौरने भारतीय संघाच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने नुपूर कश्यपच्या हातात ट्रॉफी असलेला फोटो शेअर केला. नुपूर कश्यप हिचा त्यादिवशी वाढदिवस होता आणि कॅप्शनमध्ये तिला बेस्ट फ्रेंड म्हटलं आहे. यानंतर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आणि विविध चर्चांना उधाण आलं, पण ही नुपूर कश्यप कोण आहे, जाणून घेऊया.
हरमनप्रीत कौरने इन्स्टाग्रामवर नुपूर कश्यपच्या हातात ट्रॉफी देत तिच्याबरोबर फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, “तुझ्यासाठी याहून सुंदर वाढदिवसाची भेट असूच शकत नाही! १६ वर्षांच्या स्वप्नपूर्तीचं फळ अखेर मिळालं. वाढदिवसाच्या शुभेच्छा बेस्ट फ्रेंड.” यापुढे तिने हार्ट आणि नजरचे इमोजी टाकले आहे. यानंतर हरमनने तिचा वाढदिवस एकत्र साजरा केला. यादरम्यान तिने इन्स्टाग्रामवर तिच्याबरोबर एक सेल्फी शेअर केला आणि लिहिलं, तू वेगळी आहेस, तू खास आहेस.
कोण आहे हरमनप्रीत कौरची मेत्रिण नुपूर कश्यप?
हरमनप्रीत कौर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती शेअर करत नाही. स्पोर्ट्सयारीच्या माहितीनुसार, नुपूर कश्यप ही पटियालामधील Repeat7 नावाच्या प्रीमियर फिटनेस सेंटरची संस्थापक आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे, अनेक वर्ष हरमनप्रीतचा जर्सी क्रमांक ७ होता आणि त्यानंतर तिने बदत २३ हा जर्सी नंबर घेतला.
त्याशिवाय, ती अनेक क्रिकेटपटूंसाठी टॅलेंट मॅनेजर म्हणूनही काम करत होती, ज्यामध्ये हरमनप्रीत कौर आणि हरलीन देओल यांचा समावेश आहे. मिळालेल्या अहवालांनुसार, नुपूर कश्यपचा कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स आणि एन्टरटेनमेंट या फर्मशीही जोडलेली होती, जिथे रोहित शर्माची पत्नी, रितिका सजदेह कार्यरत होती.
हरमनप्रीतने तिच्या कुटुंबाबरोबरचे वगैरे फोटो शेअर न करता फक्त नुपूर कश्यपसह पोस्ट केल्याने सर्वांचं लक्ष वेधलं आणि चर्चांनाही उधाण आलं आहे. याशिवाय नुपूर कश्यपच्या इन्स्टाग्रामवर हरमनप्रीत कौरबरोबरचे बरेचसे फोटो आहेत. याशिवाय वर्ल्डकप दरम्यानच्या दिवाळी पार्टीलाही नुुपूर उपस्थित होती.याशिवाय नुपूरच्या इन्स्टाग्रामवर गेल्या अनेक वर्षांपासूनचे हरमनप्रीत कौरबरोबरचे फोटो पोस्ट केलेले आहेत.
