Ranji Trophy Who is Umar Nazir: रणजी ट्रॉफीतील मुंबई विरूद्ध जम्मू काश्मीर सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालची जोडी उतरली. सर्वांच्या नजरा या रोहित शर्मावर होत्या, पण रोहितने पुन्हा एकदा सर्वांनाच निराश करत झेलबाद होत १९ चेंडूत फक्त ३ धावा करत माघारी परतला. पण रोहितला एकेक धाव घेण्यासाठी तडपवणारा आणि त्याला झेलबाद करणारा उमर नझीर नेमका आहे तरी कोण, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वय ३१ वर्षे, उंची ६ फूट ४ इंच आणि नाव उमर नझीर. हे नाव फार कमी लोकांनी ऐकलेलं असावं. रणजी ट्रॉफी सामन्यात त्याने रोहित शर्माला एकेका धावेसाठी जे कष्ट घेण्यास भाग पाडलं चते पाहून हे नाव नक्कीच कायम लक्षात राहिल. जम्मू-काश्मीर संघाकडून खेळणाऱ्या या गोलंदाजाने मुंबईचा स्टार फलंदाज रोहितविरुद्ध १३ चेंडूंची लढाई एकतर्फी जिंकली आहे. रोहितला उमर नझीरच्या चेंडूवर एकही धाव करता आली नाही आणि परिणामी तो झेलबाद झाला.

मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांच्यातील सामन्यात उमर नझीर आणि रोहित शर्मा आमनेसामने होते. पहिल्याच डावात उमरच्या एकाही चेंडूवर रोहित धावा करू शकला नाही. शेवटी त्याच्या १३व्या चेंडूवर पूल शॉट मारण्याच्या प्रयत्नात पूल शॉट न जाता बॅटची कड लागून चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. म्हणजे, रोहितने उमर नझीरविरुद्ध १३ चेंडूत एकही धाव घेतली नाही आणि त्याची विकेटही त्याने गमावली.

३१ वर्षीय उमर नझीर हा जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहे. १९९३ मध्ये जन्मलेला उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज उमर नझीर रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीरसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. रणजी ट्रॉफीच्या २०१८-१९ च्या हंगामात त्याने २७.८४ च्या सरासरीने २६ विकेट घेतल्या. २०१९-२० हंगामात त्याने २३.०३ च्या सरासरीने २८ विकेट घेतल्या. तर २०२२-२३ च्या हंगामात, त्याने रणजी ट्रॉफीमध्ये २२.२८ च्या सरासरीने १४ विकेट घेतल्या.

उमर नझीरने २०१३ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मुंबईविरुद्धच्या सामन्यापर्यंत खेळलेल्या ५७ सामन्यांत त्याने २९.१२ च्या सरासरीने १३८ विकेट घेतले आहेत. उमर नझीरने प्रथम श्रेणी पदार्पणानंतर अवघ्या वर्षभरात लिस्ट ए मध्ये पदार्पण केले, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत ३६ सामन्यांत ५४ विकेट घेतल्या आहेत.

रोहित शर्माने १९ चेंडूंचा सामना करत जम्मू आणि काश्मीर विरुद्ध ३ धावा केल्या. पण, मुंबई संघातील कोणताच खेळाडू उमर नझीरच्या गोलंदाजीवर धावा करू शकला नाही उमर नझीरने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रोहितला बाद केल्यानंतर त्याने अजिंक्य रहाणे आणि हार्दिक तामोरे यांसारख्या फलंदाजांच्या विकेट्सही घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is umar nazir he makes rohit to struggle for every single run in mumbai vs jammu kashmir ranji trophy bdg