हॅमिल्टन : खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर पोर्तुगालने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत व्हिएतनामवर २-० असा विजय साकारला. या पराभवानंतर व्हिएतनामचा बाद फेरीत पोहोचण्याचा मार्ग अजून आव्हानात्मक झाला आहे.पोर्तुगालने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
सामन्याच्या सातव्या मिनिटाला टेल्मा एनकार्नाकोने गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर फ्रान्सिस्का नाझारेथने (२१व्या मि.) गोल झळकावत संघाची आघाडी दुप्पट केली. या गोलमध्ये टेल्माने साहाय्य केले.तर, नेदरलँड्स व अमेरिका यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला.
First published on: 28-07-2023 at 02:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women world cup football tournament portugal win against vietnam amy