WPL 2023 GG vs UPW Match Updates: आज महिला प्रीमियर लीगच्या १७ व्या सामन्यात गुजरात जायंट्सचा सामना यूपी वॉरियर्सशी होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा आहे. पराभूत होणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका असेल. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने १७८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर यूपी वॉरियर्स समोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
हेमलता आणि गार्डनरची ९३ धावांची भागीदारी –
गुजरातने यूपीसमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ६ गडी गमावून १७८ धावा केल्या. गुजरातची सुरुवात चांगली झाली. सोफिया डंकले आणि एल वोल्वार्ड यांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. वोल्वार्डने १७ आणि डंकलेने २३ धावा केल्या. हरलीन देओलला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर दयालन हेमलता आणि अॅश्ले गार्डनर यांनी ६१ चेंडूत ९३ धावांची भागीदारी केली.
हेमलता ३३ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५७ धावा करून बाद झाली. गार्डनर ३९ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ६० धावा करून बाद झाली. दोघींनाही पार्श्वी चोप्राने बाद केले. अश्विनी कुमारीला पाच धावा करता आल्या. सुषमा वर्मा आठ धावा करून नाबाद राहिली आणि किम गर्थने एक धाव केली. पार्श्वी आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी अंजली सरवानी आणि सोफी एक्लेस्टोनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
तीन संघ फक्त एका जागेसाठी लढत आहेत –
हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा आहे. पराभूत होणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका असेल. त्याचबरोबर हा विजय त्या संघाला प्लेऑफच्या जवळ घेऊन जाईल. मुंबई इंडियन्स
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
यूपी वॉरियर्स: देविका वैद्य, अलिसा हिली (कर्णधार), किरण नवगिरे, ताहिला मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, सिमरन शेख, पार्श्वी चोप्रा, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड.
गुजरात जायंट्स: सोफिया डंकले, एल वोल्वार्ड, ऍशले गार्डनर, दयालन हेमलता, हरलीन देओल, सुषमा वर्मा (विकेटकीपर), स्नेह राणा (कर्णधार), किम गर्थ, मोनिका पटेल, तनुजा कंवर, अश्विनी कुमारी.
मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wpl 2023 ggw vs upww gujarat giants have set a target of 179 runs against up warriors vbm