WPL 2023 MI-W vs RCB-W: महिला प्रीमियर लीगमधील चौथा सामना आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेल. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने बंगळुरु ९ गडी राखून मोठा विजय नोंदवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाने १४.२ षटकात १ बाद १५९ धावा करत विजय मिळवला. या स्पर्धेतील मुंबईचा सलग दुसरा विजय आहे.

मुंबईकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक नाबाद ७७ धावा केल्या. त्याचबरोबर नॅट सिव्हरने ५५ धावांची नाबाद खेळी केली. मुंबईचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबईचे दोन सामन्यांनंतर चार गुण झाले आहेत, तर आरसीबीने सलग दुसरा सामना गमावला आहे.

या सामन्यात स्मृती मंधानाचा संघ १८.४ षटकांत सर्वबाद झाला आणि पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. आरसीबीचा संघ १५५ धावांवर आटोपला. या सामन्यात आरसीबी संघाकडून रिचा घोषने सर्वाधिक धावा केल्या. तिने २६ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. त्याचबरोबर मुंबई संघाकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

Live Updates

Mumbai Indians Women (MI-W) vs Royal Challengers Bangalore Women (RCB-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर महिला हायलाइट्स

19:09 (IST) 6 Mar 2023
MI-W vs RCB-W: आरसीबी संघाती प्लेइंग इलेव्हन

आरसीबी संघाची प्लेइंग इलेव्हन –

स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, दिशा कासट, रिचा घोष (विकेटकीपर), हीदर नाइट, कनिका आहुजा, मेगन शुट, श्रेयंका पाटील, प्रीती बोस, रेणुका सिंग.

19:04 (IST) 6 Mar 2023
MI-W vs RCB-W: नाणेफेक जिंकून आरसीबीचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

आरसीबी संघाची कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मृती मंधानाने सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली.

19:01 (IST) 6 Mar 2023
MI-W vs RCB-W: नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज

नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज

18:59 (IST) 6 Mar 2023
MI-W vs RCB-W:दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

स्मृती मानधना (कर्णधार), एलिस पेरी, हीदर नाइट, ऋचा घोष, सोफी डिव्हाईन, दिशा कासट, कनिका आहुजा, आशा शोभना, प्रीती बोस, मेगन शुट आणि रेणुका सिंग.

मुंबई इंडियन्स:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), नताली सायव्हर ब्रंट, पूजा वस्त्राकर, इसाबेल वोंग, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, अमेलिया केर, अमनजोत कौर, जिंतीमनी कलिता आणि सायका इशाक.

18:55 (IST) 6 Mar 2023
MI-W vs RCB-W: हरमनप्रीत कौर की स्मृती मंधाना कोण सरस?

स्मृती मंधानाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ११६ सामन्यात २८०२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर हरमनप्रीत कौरने १५१ सामन्यात ३०५८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर मागील सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले आहे.

18:46 (IST) 6 Mar 2023
MI-W vs RCB-W: आजचा सामना हाय स्कोअरिंग असेल!

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमची खेळपट्टी सपाट असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील सामना हाय स्कोअरिंग होईल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे पहिल्या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती. आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये पहिल्या डावातील धावसंख्या २०० हून अधिक झाली आहे. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

18:42 (IST) 6 Mar 2023
MI-W vs RCB-W: दोन्ही संघात सात वाजता होणारा नाणेफेक

मुंबई आणि बंगळुरु संघात सातला नाणेफेक होणार आहे. त्यानंतर साडेसातला सामन्याला सुरुवात होईल.

18:29 (IST) 6 Mar 2023
MI-W vs RCB-W: मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ –

मुंबई इंडियन्स संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), नताली सायव्हर, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा खाजी, सोनामका यादव, जिंतामणी कलिता, नीलम बिश्त.

18:28 (IST) 6 Mar 2023
MI-W vs RCB-W: आरसीबी संपूर्ण संघ

आरसीबी संपूर्ण संघ –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष (यष्टीरक्षक), एरिन बर्न्स, दिशा कसाट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, आशा शोभना, श्रेयंका पाटील, हीदर नाइट, डेन वॅन निकार्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल जंजाड, मेगन शट आणि सहाना पवार

18:25 (IST) 6 Mar 2023
MI-W vs RCB-W:दोन्ही संघाचा आज दुसरा सामना

दोन्ही संघाचा आज दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे, तर बंगळुरु संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Mumbai Indians Women (MI-W) vs Royal Challengers Bangalore Women (RCB-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर महिला हायलाइट्स

बईने आरसीबीचा नऊ गडी राखून पराभव केला. 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाने 14.2 षटकात 159 धावा करत लक्ष्य गाठले.