wrestling dropped from 2026 commonwealth games zws 70 | Loksatta

राष्ट्रकुल स्पर्धेतून कुस्तीला वगळले! ; २०२६च्या स्पर्धेसाठी नेमबाजीचा समावेश

राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि राष्ट्रकुल क्रीडा ऑस्ट्रेलियाने मिळून बुधवारी २०२६च्या स्पर्धेसाठीच्या खेळांची यादी जाहीर केली.

राष्ट्रकुल स्पर्धेतून कुस्तीला वगळले! ; २०२६च्या स्पर्धेसाठी नेमबाजीचा समावेश
प्रातिनिधिक छायाचित्र

मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे २०२६ साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचे पुनरागमन होणार असून कुस्ती आणि तिरंदाजी या खेळांना मात्र स्पर्धेतून वगळण्यात आले आहे.

राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि राष्ट्रकुल क्रीडा ऑस्ट्रेलियाने मिळून बुधवारी २०२६च्या स्पर्धेसाठीच्या खेळांची यादी जाहीर केली. यात २० खेळ आणि २६ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

या वर्षी बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वादग्रस्तरीत्या वगळण्यात आले होते. मात्र, २०२६च्या स्पर्धेत नेमबाजीचे पुनरागमन होणे ही भारतासाठी सकारात्मक बाब आहे. राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारताला सर्वाधिक १३५ पदके (६३ सुवर्ण, ४४ रौप्य व २८ कांस्य) ही नेमबाजीत मिळाली आहे. २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला एकूण पदकांपैकी २५ टक्के पदके ही नेमबाजांनी मिळवून दिली होती. या स्पर्धेत भारताने एकूण ६६ पदके जिंकली होती, ज्यापैकी १६ पदके (७ सुवर्ण, ४ रौप्य, ५ कांस्य) नेमबाजीत मिळाली होती.  

कुस्तीला राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळण्यात येणे हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला कुस्तीपटूंनी वर्चस्व गाजवताना सर्व १२ वजनी गटांत पदके (६ सुवर्ण, १ रौप्य, ५ कांस्य) पटकावली होती. २०१० पासून सलग चार पर्वामध्ये कुस्तीचा समावेश होता. परंतु कुस्ती हा खेळ ऑस्ट्रेलियामध्ये फारसा प्रचलित नाही. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचे खेळ हे यजमान देशाकडून निवडले जातात. 

तिरंदाजी हा खेळ केवळ दोन (१९८२ आणि २०१०) राष्ट्रकुल स्पर्धामध्ये खेळला गेला आहे. या खेळाच्या पदकतालिकेत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिरंदाजीचा समावेश न होण्याचा भारताला फटका बसू शकेल.

काही महिन्यांपूर्वी २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी खेळांची प्रारंभिक यादी जाहीर करण्यात आली होती आणि यात नेमबाजी, कुस्ती व तिरंदाजी या खेळांचा समावेश नव्हता. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) राष्ट्रकुल क्रीडा महासंघाला पत्र लिहून आपली नाराजी कळवली होती. या तीन खेळांना वगळण्यात येणे हे धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर अंतिम यादीत नेमबाजीचा समावेश करण्यात आला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
श्रीजेश, सविता सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ; ‘एफआयएच’कडून सलग दुसऱ्या वर्षी सन्मान

संबंधित बातम्या

IND vs BAN 2nd ODI: ‘जाळ अन् धूर संगटच…’ उमरान मलिकच्या १५१ किमी वेगाने फलंदाजाच्या दांड्या गुल, पाहा video
विश्लेषण: पोर्तुगाल संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोला का वगळले? रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही अखेर समजावी का?
David Warner: “क्रिकेटपेक्षा माझे कुटुंब माझ्यासाठी महत्त्वाचे…” डेव्हिड वॉर्नरने कर्णधारपदावरून क्रिकेट ऑस्ट्रेलियावर केली टीका
विश्लेषण: वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याआधी मोबाईलप्रमाणे चार्ज करतात फुटबॉल; यामागील कारण आहे फारच खास
Suresh Raina Video: लॉर्डसच्या ग्राऊंडवरुन थेट गल्लीच्या मैदानावर; सुरेश रैनाचा साधेपणा चाहत्यांनाही भावला

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“२ जोडी कपडे, गोठलेले हात पाय…” अभिनेत्री ते साधू या खडतर प्रवासाबद्दल अनू अगरवालचा खुलासा
Video: टॉवेल गुंडाळून ‘तो’ थेट मेट्रोत शिरला; आत जाताच असं काही केलं की मुलींनी तोंडच लपवली
रुळाचा आवाज हेरून त्याने टाळली रेल्वेची मोठी दुर्घटना; पुणे विभागातील रेल्वे चालकाचा मध्य रेल्वेकडून गौरव
“अंगावर येऊ नकोस” अमृता धोंगडे आणि प्रसादमध्ये राडा; चिडलेली अमृता म्हणाली, “कोणाची बुद्धी….”
सकाळी चेहरा धुताना कोणते पाणी वापरावे थंड की गरम? जाणून घ्या Skin Care बाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी