scorecardresearch

Commonwealth Games 2022

२८ जुलै २०२२ ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम (Birmingham 2022) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) २२व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. बर्मिंगहॅम शहरातील अलेक्झांडर स्टेडियमवर ही स्पर्धा पार खेळवली जात आहे. गेल्या २० वर्षांत इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा या खेळांचे आयोजन होत आहे.

१९३० मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची (CWG 2022) ही २२वी आवृत्ती आहे. पहिली स्पर्धा १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन शहरात आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी ११ देशांतील सुमारे ४०० खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २८३ वेगवेगळ्या इव्हेंट्सचा समावेश आहे. विविध देशांतील ७२ संघ विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी सुमारे सहा हजार ५०० खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंगहॅममध्ये दाखल झाले आहेत.

भारत १८ व्यांदा या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८१ सुवर्ण, १७३ रौप्य आणि १४९ कांस्य पदके जिंकली आहेत. २००२ मँचेस्टर गेम्सपासून प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट होत आला आहे. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2022) ही, २०१२ च्या लंडन ऑलिंपिकनंतर ब्रिटनमधील सर्वात महागडी स्पर्धा असल्याचे म्हटले जात आहे. बर्मिंगहॅममध्ये आयोजित खेळांसाठी ७७८ दशलक्ष पौंड (सुमारे ७४ अब्ज) खर्च झाला आहे.

Read More

Commonwealth Games 2022 News

Commonwealth Games 2022
Commonwealth Games 2022: महाराष्ट्रातील पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रकमेमध्ये मोठी वाढ, जागतिक क्रीडा दिनी होणार वितरण

याआधी राज्य सरकारकडून सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना अनुक्रमे साडेबारा लाख, सात लाख आणि पाच लाखांचं बक्षिस जाहीर…

CWG 2022 India Performance
Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेमधील भारताच्या यशाचे गमक काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

CWG 2022: गुणवत्तेचा आणि कौशल्यांचा विचार केला तर भारतीय खेळाडूंनी कमालीची प्रगती केली आहे.

maharashtras athletes
राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंना पाचच पदके!

राष्ट्रकुल स्पर्धेत उत्तरेकडील खेळाडूंनी आपले नाणे खणखणीत वाजवले. यातही ईशान्येकडील खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले,

comman
राष्ट्रकुलमध्ये ६१ पदकांसह भारत चौथ्या स्थानी

भारताने बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदकांसह एकूण ६१ पदकांची कमाई केली.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : क्रिकेट : महिला संघाला सुवर्णपदकाची हुलकावणी ; चुरशीच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाकडून नऊ धावांनी पराभूत

राष्ट्रकुलमधील सुवर्णपदकासाठी झालेल्या अंतिम लढतीत १६२ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताचा डाव १९.३ षटकांत १५२ धावांत संपुष्टात आला.

Achanta Sharath Kamal Gold Medal
CWG 2022: ४०वर्षीय अचंताचा राष्ट्रकुल स्पर्धेत ‘जलवा’; सुवर्ण पदक पटकावून केला शेवट गोड

Achanta Sharath Kamal Gold Medal : अचंता शरथने २००६मध्ये राष्ट्रकुल पदार्पण केल्यापासून आतापर्यंत एकूण १३ पदके जिंकली आहेत.

Narendra Modi Pooja Gehlot Pakistan
CWG 2022: पंतप्रधान मोदींची ‘ती’ कृती पाहून पाकिस्तानी पत्रकार भारावला; म्हणाले “आमच्या पंतप्रधानांना तर…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूचं सांत्वन केल्याने नेटकऱ्यांकडून कौतुक

indian boxers performance
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : नितू, निकहत, अमितचे सोनेरी यश

२०१८च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमितने अंतिम लढतीत इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डला पराभूत केले.

2022 women s hockey semi finals
महिला हॉकीत सुवर्णपदक हुकले ; उपांत्य फेरीत शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून वादग्रस्तरीत्या पराभूत

१-१ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ०-३ असा पराभव पत्करला

SAKSHI MALIK AND BAJRANG PUNIYA
CWG 2022 : बजरंग पुनिया, साक्षी मलिकची ‘सोनेरी’ कामगिरी; कुस्तीमध्ये भारताच्या नावावर दोन सुवर्णपदकं

भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२: भारताच्या सुधीरची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी, पंतप्रधान मोदींकडून कौतुक

२७ वर्षीय सुधीर पोलिओग्रस्त आहे. या आजारपणाचा सामना करुन जिद्दीच्या जोरावर सुधीरने अथक प्रयत्नाअंती हे यश प्राप्त केले आहे

Commonwealth Games
Commonwealth Games: भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी; उंच उडी, ज्युडो, वेटलिफ्टिंग आणि स्क्वॉशमध्ये केली पदकांची कमाई

उंच उडी प्रकारामध्ये भारताला पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक मिळालं आहे

Alysha Newman
Commonwealth गोल्ड मेडलिस्ट Alysha Newman ने OnlyFans वर शेअर केले न्यूड फोटो, पहा बोल्ड अंदाज

कॅनेडियन स्टार खेळाडू अलिशा न्यूमन हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Why sportspersons from North East are consistently shining
विश्लेषण: ईशान्येकडील खेळाडू क्रीडा क्षेत्रात का चमकत आहेत?

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून पुन्हा एकदा ईशान्येकडील खेळाडूंची कामगिरी लक्षणीय ठरत आहे

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Commonwealth Games 2022 Photos

Commonwealth Games 2022
9 Photos
Photos: राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा; पदकांचा वर्षाव सुरूच

बर्मिंघममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताची पदकांची संख्या 55 वर पोहोचली आहे.

View Photos
Commonwealth Games 2022
12 Photos
Photos : स्मृती मंधाना ते पीव्ही सिंधू…भारतीय खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेत मैदान मारण्यासाठी सज्ज

Commonwealth Games 2022 : भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे.

View Photos
Commonwealth Games 2022 Beautiful Athletes
12 Photos
Photos : स्मृती मंधाना ते दीपिका पल्लीकल… राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकासाठी लढताना दिसणार ‘फिअरलेस ब्युटीज’

Commonwealth Games 2022 Beautiful Athletes : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या काही महिला खेळाडू सौंदर्यवतींपेक्षा कमी नाहीत.

View Photos
ताज्या बातम्या