वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अपयशी ठरला. खराब फटका खेळत तो बाद झाला. त्याला केवळ ४ धावांचे योगदान देता आले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने त्याला परतीचा मार्ग दाखवला. पंतने अशाप्रकारे बाद झाल्यानंतर चाहत्यांना प्रचंड राग आला. लोकांनी सोशल मीडियावर पंतबाबत आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या.

इतकेच नव्हे तर, पंत आणि जेमीसनविषयी जबरदस्त मीम्सही शेअर करण्यात आले आहेत. भारताच्या पहिल्या डावातील पंत ७४व्या षटकात बाद झाला. भारतीय चाहत्यांना ऋषभ पंतकडून मोठ्या आशा होत्या.

हेही वाचा – VIDEO : ‘फादर्स डे’च्या निमित्ताने सचिनने बनवला खास ‘झोपाळा’, सांगितली जुनी आठवण

 

 

 

 

 

भारताचा पहिला डाव

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला कालपासून सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी भारताने १४६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारत पहिल्या डावात ९२.१ षटकात २१७ धावा करू शकला. विराटने ४४ तर अजिंक्यने ४९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने ३१ धावांत ५ बळी घेत भारताच्या डावाला सुरूंग लावला. न्यूझीलंडने आपल्या डावाची सुरुवात केली आहे.