दिग्गज फिरकीपटूंना माघारी धाडत पाकिस्तानचा यासिर शहा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० बळी घेणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यासिर शहाने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्लॅरी ग्रिमेट यांच्या नावे असलेला विक्रम यासिर शहाने आज मोडला आहे. ग्रिमेट यांनी २८ कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता, तर यासिर शहाने २७ व्या कसोटीमध्येच हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकेचा लहिरु थिरीमने हा यासिर शहाचा १५० वा बळी ठरला. या सामन्यात यासिर शहाने पाकिस्तानच्या वकार युनूसच्या २७ सामन्यांमध्ये १५० बळी घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. या विक्रमाची दखल घेत आयसीसीनेही त्याचं अभिनंदन केलं आहे.

यासिरने या सामन्यात आपल्याच देशाच्या सईद अजमलचा विक्रमही मोडीत काढला आहे. अजमलने २९ कसोटीत १५० बळी घेतले होते. सध्या आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत यासिर शहा १५ व्या स्थानावर आहे. याचवर्षी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासिर शहाचा, देशातील सर्वोत्तम कसोटीपटू हा पुरस्कार देऊन गौरव केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yasir shah becomes fastest spinner to take 150 wickets in test cricket