सिक्सर किंग युवराज सिंग नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. आपल्या ट्वीट आणि पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. आता भारतीय कर्णधारपदाचा वाद सुरु असताना युवराज सिंगची सोशल मीडिया पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आज आपला २४ वा वाढदिवस साजरा करत आहे. ऋषभ पंतला भारतीय संघाचा भावी कर्णधार असा उल्लेख करत युवराज सिंगने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. युवराज सिंगने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ऋषभ पंतचा भावी कर्णधार असा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर आयपीएल आणि टी २० विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच विराट कोहलीने टी २० विश्वचषकानंतर टी २० आणि आरसीबीचं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे युवराज सिंगच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पाजी माझा वाढदिवस आला आहे. सर्वांनी जोरात बोला हॅप्पी बर्थडे…वाढदिवसाच्या शुभेच्छा ऋषभ पंत. खूप मेहनत कर आणि ध्येय गाठ..भारताच्या भावी कर्णधाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आयपीएल आणि टी २० विश्वचषकासाठी गुड लक. खूप सारं प्रेम आणि शुभेच्छा”, अशी पोस्ट युवराज सिंगने इन्स्टाग्रामवर केली आहे.

ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करत आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात श्रेयस अय्यरच्या जागेवर त्याला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. दुसऱ्या टप्प्यात अय्यर पुनरागमन झाल्यानंतरही पंतकडेच दिल्लीचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. पंतच्या नेतृत्वाखालील संघाने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. दिल्लीने १२ सामन्यापैकी ९ सामन्यात विजय, तर ३ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh birthday wish to future captain rmt