अनेकांना हवा-हवासा वाटणारा पावसाळा अनेक समस्या घेऊन येत असतो. पावसाळ्यात ओले कपडे वाळवणे म्हणजे खूप अवघड काम असते. दमट, थंड वातावरणामुळे कितीही प्रयत्न केले तरी ओले कपडे लवकर सुकत नाहीत. यात माती आणि चिखलाचे डाग आणि रस्त्यावरील खराब पाण्यामुळे कपडे खराब झालेले असतात, यामुळे पावसाळ्यात रोजच्या रोज कपडे धुण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण हे ओले कपडे लवकर न वाळल्यामुळे काहीवेळाने त्यांना कुबट, आंबट वास यायला लागतो. या समस्येने अनेकजण हैराण असतात. अशावेळी कपड्यांचा वास घालवण्यासाठीचे सोपे घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरु शकतील. यामुळे पावसाळ्यात घरात कपडे सुकवण्याचे ५ अशा सोप्प्या पद्धत जाणून घेऊ…
१) ओले कपडे एकाजागी गुंडाळून ठेऊ नका
बहुतेक लोक रोजचे कपडे धुण्याचे कपडे एका बादलीत किंवा मशीनमध्ये जमा करुन ठेवतात. पण पावसाळ्यात अंगावरील ओले कपडे असे एका ठिकाणी खूप वेळ गुंडाळून ठेवल्यास त्यांना कुबट वास येतो, जो धुतल्यानंतरही जात नाही. म्हणून ओले कपडे दोरीवर वेगळे ठेवा आणि धुतल्यानंतर ते मशीनमध्ये वाळावा.
२) कपडे नियमित धुवा
ओले आणि घाणेरडे कपडे खूप दिवस असेच ठेवू नका, जितक्या लवकर ते धुवूता येतील तितक्या लवकर ते धुवा, यामुळे कपड्यांना येणारी दुर्गंधी कमी होईल. तसेच पावसाळ्यात बाहेरून आपल्यानंतर अंगावरील कपडे नियमित धुवा.
३) व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा वापरा
नियमित वापर असलेली वॉशिंग पावडर तुमच्या कपड्यांमधून येणारा कुबट वास दूर करु शकत नाही, यामुळे पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी घालवण्यासाठी डिटर्जंटसोबत पाण्यात थोडे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घाला. यामुळे कपड्यांवरील दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.
४) कपडे नीट कोरडे होईपर्यंत सुकवा
जर सतत पाऊस पडत असेल आणि तरीही तुम्ही कपडे धुतले असतील तर हवामान साफ होण्याची वाट पाहू नका. धुतलेले कपडे घरात पसरवून पंख्याच्या खाली वाळवा, सूर्यप्रकाश आल्यानंतर ते बाहेर सुकत घाला.
५) लिंबाचा रस मिसळा
तुम्ही ज्या पाण्यात कपडे भिजवले आहेत त्या पाण्यात थोडा लिंबाचा रस टाकू शकता. यामुळे कपड्यांना कुबट वास येणार नाही आणि कपडे स्वच्छ दिसतील.