बाजरीची भाकरी अनेकांना आवडते. लहानांपासून वृद्धापर्यंत अनेक जण आवडीने बाजरीची भाकरी खातात. बाजरीची भाकरी चवीला स्वादिष्ट आणि रुचकर असते. यात भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक आढळतात जे आरोग्यास गुणकारी असतात. पण तुम्हाला माहिती आहे का बाजरीची भाकरी हिवाळ्यात खाणे, अधिक फायदेशीर आहे. आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. न्युट्रिशनिस्ट जुही कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हिवाळ्यात बाजरी का खावी, याविषयी सांगितले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्युट्रिशनिस्ट जुही कपूर यांनी सांगितल्याप्रमाणे –

हिवाळ्यात खालील पाच कारणांमुळे बाजरी खावी.

१. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर आणि इतर पौष्टिक घटक असतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मॅग्नेशियम रक्तदाब कमी करण्यासाठी ओळखला जातो. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
२.बाजरी खाल्यानंतर लगेच पोट भरतं त्यामुळे अति जेवण करणे टाळतो आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
३. यात फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे बाजरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगला पर्याय आहे. यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढत नाही.
४. बाजरी पचायला सोपी असते त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.
५. ग्लुटेनची अॅलर्जी असणाऱ्या लोकांनी आहारात बाजरीचा समावेश करावा.

हेही वाचा : Sleep in Winter : हिवाळ्यात जास्त झोप का लागते? झोपेच्या सवयीवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात.. 

thejuhikapoor या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन न्युट्रिशनिस्ट जुही कपूर यांनी ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाजरीबरोबर भाकरीचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महाराष्ट्रातील सर्वोत्तम आहार म्हणजे तिळ घालून केलेली बाजरी. ही आरोग्यादायी आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असते पण याबरोबरच यात फायबर आणि कॅलरीचे प्रमाण सुद्धा कमी असतात.
या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारले, “तिळ घातलेली भाकरी कशी बनवायची? तर एका युजरने विचारले आहेत,”किती भाकरी खाव्यात?”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 reasons to eat bajra in the winters health benefits of bajra bhakri in winters ndj