Is Amla Juice Effective in Reversing Diabetes : मधूमेह म्हणजेच मधुमेह ही अशी अवस्था आहे जिथे शरीरातील पॅन्क्रियाज पर्याप्त प्रमाणात इन्सुलिन हार्मोन तयार करू शकत नाही किंवा तयार झालेल्या इन्सुलिनचा योग्य वापर शरीर करत नाही. त्यामुळे रक्तातील शर्करेचचे प्रमाण वाढते आणि दीर्घकाळात हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि नसांवर गंभीर परिणाम होतो. पण या आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच योग्य काळजी घेतली, तर ते नियंत्रणात आणता येऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये तर पूर्णपणे रिव्हर्सही होऊ शकते.

प्रीडायबिटीज आणि त्यावर नियंत्रण

डॉक्टरांच्या मते, मधूमेह येण्यापूर्वीची अवस्था म्हणजे प्रीमधूमेह. यात रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा थोडं अधिक असतं, परंतु ते मधूमेहच्या मर्यादेपर्यंत पोहोचलेले नसते. जर या अवस्थेत योग्य आहार, व्यायाम आणि हेल्दी जीवनशैली अवलंबली, तर मधूमेह टाळता येऊ शकते. तज्ज्ञ सांगतात की, सुरुवातीच्या एक-दोन वर्षांत जीवनशैली सुधारल्यास रक्तातील सारखेची पातळी पुन्हा सामान्यपर्यंत आणणे शक्य आहे. पण या स्थितीकडे दिर्घकाळापर्यंत दुर्लक्ष केल्यास हळू हळू तुम्हाला टाईप २ मधूमेह होऊ शकतो.

आवळा रस मधूमेहासाठी फायदेशीर का?

आयुर्वेदानुसार आवळा हा ‘मधूमेहासाठी फायदेशीर फळ’ मानले जाते. यात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराची इन्सुलिन संवेदनशिलता वाढवतात. यामुळे शर्करचे उर्जेमध्ये रूपांतरित होण्याची प्रक्रिया जलद होते आणि रक्तातील सारखेची पातळी नियंत्रित राहते.

मधूमेह कोच अनुपम घोष यांच्या मते, आवळा रस “मॅजिकल ड्रिंक” आहे, परंतु फक्त आवळा रस पिण्याने मधूमेह बरा होईल असं नाही. तसेच कमी चरबी असलेला आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा समतोल साधल्यास आवळा रस मधूमेह नियंत्रणात आणि बरा करण्यात प्रभावी ठरू शकतो.

आवळा रस कसा घ्यावा?

डॉक्टर सांगतात की, “सकाळी रिकाम्या पोटी ताज्या आवळ्याचा रस घेतल्याने रक्तातील साखर संतुलित राहते, यकृतातील विषारी घटक बाहेर पडतात आणि चयापचय सुधारते. आवळ्यातील क्रोमियम घटक कार्बोहायड्रेट चयापचय सुधारते, ज्याचा मधूमेहच्या रुग्णांना दीर्घकालीन फायदा होतो.

घरगुती रस वापरणे उत्तम. बाजारातील फ्लेवर असलेले किंवा साखरयुक्त रस टाळावेत. हवे असल्यास आवळा रस कारले किंवा कडूलिंबाचा रसाबरोबर मिक्स करून घेतल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात.

हे मिश्रण रक्त शुद्ध करते, पॅन्क्रियाज सक्रिय करते आणि शरीरात इन्सुलिन उत्पादन वाढवते — परिणामी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि मधूमेह बरा होण्याची शक्यता वाढते.