Avoid These 5 Fruits with Milk : दूध पिणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पण दूध योग्य वेळी आणि योग्य पदार्थांबरोबर प्यायले पाहिजे. तंदुरुस्त होण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी सहसा लोक केळ खातात किंवा दूध पितात. दूध आणि केळ हे आरोग्यासाठी वरदान आहे पण दूध आणि केळ एकत्र खाऊ नये. कारण त्यामुळे आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. त्याबरोबर केळीशिवाय इतर काही फळ आहेत ज्यांचे दुधाबरोबर सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आयुर्वेदिक वैद्य डॉ. भुवनेश्वरी यांनी सांगितले की, दुधाबरोबर कोण कोणते फळ खाऊ नये आणि असे केल्याने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो.

डॉ. भुवेनेश्वरी यांच्या मतानुसार, आयुर्वेदामध्ये दूध आणि फळ एकत्र न खाणे विरुद्ध आहारा मानला जातो कारण दूध आणि फळांचे गुणधर्म हे परस्पर विरोधी असतात आणि अशा स्थितीमध्ये दुधाबरोबर काही फळांचे सेवन केल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते. त्यांचे पचन नीट होऊ शकत नाही आणि अनेक गंभीर आजार होण्याचे कारण बनू शकते.

आंबट फळ दुधाबरोबर खाऊ नये

दूध आणि आंबट फळे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आवळा, लिंबू, संत्री आणि हंगामी फळे एकत्र खाऊ नयेत. आयुर्वेदानुसार, आंबट फळांमध्ये असलेले आम्ल दुधात मिसळल्यास पचनाच्या समस्या निर्माण करू शकते.

दूध आणि अननस

दूध आणि अननस एकत्र खाऊ नये. अननसामध्ये असलेले ब्रोमलॅन नावाच्या एन्जमाईम दूधासह प्रक्रिया झाल्याने ते खराब होऊ शकते ज्यामुळे ते घट्ट दहीसारखे होते. यामुळे काही लोकांना पचनासंबधीत समस्या होऊ शकते. अशा स्थितीमध्ये दुधाबरोबर अननसाचे सेवन करणे टाळले पाहिजे.

डाळिंब आणि दूध

डाळिंब आणि दुधाचे एकत्र सेवन करू नये. दोन्ही एकत्र खाल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. डाळिंब खाल्यानंतर दूध प्यायचे असेल तर त्यामध्ये कमीत कमी अर्ध्या तासाचे अंतर ठेवा जेणेकरून अन्न पचण्यासाठी वेळ मिळू शकतो. तसेच दोन्ही एकत्र कधीही पिऊ नये.

दूध आणि पेरू

दूध आणि पेरू एकत्र सेवन करू नये. यामुळे आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते आणि दुधात मिसळल्यास ते पचनाच्या समस्या निर्माण करू शकते. यामुळे काही लोकांना पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा इतर पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

पपई आणि दूध

पपई आणि दूध एकत्र सेवन करू नये. पपईमध्ये असलेले पपेन नावाचे एंजाइम दुधाबरोबर प्रतिक्रिया देऊ शकते, ज्यामुळे पचन समस्या निर्माण होऊ शकतात. या दोन्हीचे सेवन केल्याने पोटदुखी, गॅस किंवा अतिसार यासारख्या समस्या उद्भवू शकतात.