Vegetables for Uric Acid Reduction: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेकांना कमी वयातच सांधेदुखी, हातपाय सुजणे आणि शरीरातील ताठरपणा यांसारख्या तक्रारी जाणवतात. बहुतेकजण याला वाढत्या वयाचा परिणाम समजतात, पण खरा दोष असतो शरीरात वाढणाऱ्या युरिक अॅसिडचा. हेच युरिक अॅसिड हळूहळू हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये साचतं आणि नंतर गाठींसारख्या असह्य वेदनादायक आजाराचं कारण ठरतं.

तज्ज्ञ सांगतात की, चुकीचे खाणे, कमी पाणी पिणे, व्यायामाचा अभाव आणि तेलकट अन्नपदार्थांचे अतिसेवन हे सगळे घटक या आजाराला आमंत्रण देतात. पण सर्वात मोठं रहस्य असं की, शरीरातील या धोकादायक आम्लाला कमी करण्यासाठी काही साध्या भाज्याच उपाय ठरतात.

युरिक अॅसिड वाढलं की शरीरात विषारी द्रव्यं साचू लागतात. पण, काही विशिष्ट भाज्यांचं नियमित सेवन केल्यास हे घटक लघवीतून बाहेर टाकले जातात आणि शरीर पुन्हा हलकं, ऊर्जावान आणि निरोगी होतं. चला जाणून घेऊया त्या पाच ‘अद्भुत’ भाज्या ज्या काही दिवसांतच युरिक अॅसिडचं प्रमाण घटवतात.

युरिक अॅसिड कमी करण्यासाठी फक्त ५ भाज्या

१. काकडी

थंडावा देणारी आणि पाण्याने भरलेली काकडी शरीरातील अपायकारक द्रव्यं मूत्राद्वारे बाहेर टाकते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स सूज कमी करून सांध्यांना आराम देतात. रोजच्या आहारात काकडीचा समावेश केल्यास शरीरातील स्वच्छता आपोआप होते.

२. टोमॅटो

टोमॅटोतील व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन हे घटक युरिक अॅसिड कमी करण्यासाठी जादूई काम करतात. हे घटक शरीरातील आम्ल कमी करतात आणि मूत्रपिंडांवरील ताण कमी करतात. रोज एक-दोन टोमॅटो खाल्ल्यास सांधेदुखीपासून मोठा दिलासा मिळतो.

३. ढोबळी मिरची (शिमला मिरची)

लाल, हिरवी, पिवळी या तिन्ही रंगांच्या मिरच्यांत व्हिटॅमिन सी भरपूर असतं, यामुळे सांध्यातील सूज कमी होते आणि हाडं बळकट होतात. विशेष म्हणजे यात प्यूरीनचे प्रमाण अत्यल्प असल्याने युरिक अॅसिड वाढत नाही.

४. गाजर

गाजरातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करतात. दररोज एक गाजर कच्चं खाल्ल्यास काही आठवड्यांत फरक दिसू शकतो.

५. कारलं

कारल्याचा रस हे नैसर्गिक औषध मानले जाते. यातले खनिज घटक शरीराचं संतुलन राखतात आणि युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात ठेवतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कारल्याचा रस घेतल्यास सांध्यांतील वेदना लवकर कमी होतात.

शरीरातील युरिक अॅसिड नैसर्गिकरीत्या कमी करण्यासाठी या भाज्या सर्वोत्तम आहेत. सातत्य ठेवल्यास हाडं मजबूत होतात आणि सांधेदुखी दूर राहते. म्हणूनच, जर तुम्हालाही हाता-पायात जडपणा, सूज किंवा वेदना जाणवत असतील, तर औषधांवर अवलंबून राहू नका या ५ भाज्या तुमच्या थाळीत रोज ठेवा आणि फरक स्वतः अनुभवा.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)