चॉकलेट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्सची समस्या वाढते का? जाणून घ्या | Can chocolate and oily food increses pimple and acne problem know the truth | Loksatta

चॉकलेट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्सची समस्या वाढते का? जाणून घ्या

चॉकलेट आणि तेलकट पदार्थ जास्त खाल्लाने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते असे म्हटले जाते, या गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे का जाणून घ्या.

चॉकलेट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्सची समस्या वाढते का? जाणून घ्या
(photo : Freepik)

चेहऱ्यावर येणाऱ्या पुरळ किंवा पिंपल्सच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. पिंपल्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होण्याबरोबर त्वचेची जळजळ होणे, त्वचेवर पिंपल्समुळे वेदना होणे अशा समस्या देखील उद्भवतात. यावर उपाय करण्यासाठी अनेकजण महागड्या ट्रीटमेंटचा किंवा केमिकल असणाऱ्या प्रोडक्टचा वापर करतात. पण यामुळे कधीकधी त्वचेचे आणखी नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार असे प्रोडक्ट वापरावे.

चॉकलेट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स जास्त येतात असे तुम्ही बऱ्याचवेळा ऐकले असेल. जेव्हा ऑइल ग्लॅन्डमध्ये अतिप्रमाणात सीबम तयार होते तेव्हा पिंपल्स येतात. मग चॉकलेट आणि तेलकट पदार्थांचा याच्याशी संबंध काय आहे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. यांमध्ये काही संबंध आहे का आणि यामुळे पिंपल्स येतात का जाणून घेऊया.

आणखी वाचा : हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतील ‘या’ गोष्टी; लगेच जाणून घ्या

चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये असणारे काही घटक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. तसेच डार्क चॉकलेट मध्ये असणारे अँटिऑक्सिडंट त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे चॉकलेट खाल्ल्याने पिंपल्स येण्याची शक्यता कमी आहे. पण तरीही तुम्हाला जर ही समस्या जाणवत असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. पिंपल्स पासून लवकर सुटका मिळवण्यासाठी डॉक्टर योग्य उपचारांचे मार्गदर्शन करतील.

तेलकट पदार्थ
तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्वचा तेलकट होते आणि त्यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवते असे मानले जाते. परंतु पिंपल्स सीबम या तेलकट कंपाऊंडमुळे येतात. त्याचा तेलकट पदार्थांशी संबंध नाही. यातील मुख्य बाब म्हणजे तेलकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स येतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
फॅटी लिव्हरने होऊ शकतो कर्करोग, त्याची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा

संबंधित बातम्या

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स
१ जानेवारी पासून गुरु ‘या’ ३ राशींना देणार प्रचंड धनलाभाची संधी; ६ महिने अमाप पैसे कमावू शकतील ‘ही’ मंडळी
“घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण…” नीना गुप्ता यांनी मांडलं भारतीय लग्नसंस्थेबद्दल मत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमधील आंदोलनात हाँगकाँगच्या नागरिकांचा सहभाग नको : सुरक्षा मंत्री
‘प्रचारकी चित्रपट मी ओळखू शकतो’; ‘काश्मीर फाइल्स’बाबत विधानावर लापिड ठाम
भारत-अमेरिका लष्करी कवायतीला चीनचा विरोध; दोन्ही देशांच्या सीमा कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप
कर्नाटक उच्च न्यायालयाकडून ‘पीएफआय’वरील बंदी कायम
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान