Chapati is soft and does not bloom nicely? Then try these tips | चपाती मऊ आणि छान फुलत नाही? मग ट्राय करा 'या' टिप्स | Loksatta

चपाती मऊ आणि छान फुलत नाही? मग ट्राय करा ‘या’ टिप्स

मऊ आणि छान फुललेली चपाती कशी बनवायची ते जाणून घ्या. काही सोप्या टिप्ससह चपाती छान फुलू शकते आणि मऊ होऊ शकते.

chapati
उत्तम चपाती बनवण्यासाठी सोप्या टिप्स (प्रातिनिधिक फोटो)

आपल्या रोजच्या जेवणात आवर्जून चपाती असतेच. चपाती शिवाय अनेकांचं जेवण पूर्णचं होत नाही. काहींना संपूर्ण जेवण बनवता येत पण फुललेली आणि मऊ चपाती येत नाही. काहीही केलं तर अनेकदा चपाती फुललत नाही आणि भाजल्यावर कडक होते. यासाठीच आज आम्ही तुम्हाला मऊ आणि छान फुललेली चपाती कशी बनवायची ते सांगणार आहोत, ज्यामुळे चला जाणून घेऊया चपाती बनवण्याची सोपी पद्धत…

पीठ मळताना हे लक्षात ठेवा

पीठ चांगले मळून झाल्यावर २० मिनिटे झाकून ठेवा. यामुळे सेट होईल.

नार हाताला तेल लाऊन पुन्हा एकदा पीठ मऊ आणि गुळगुळीत करा.

आता चपाती बनवण्यासाठी छोटे गोळे तयार करा.

( हे ही वाचा: वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य गेटवर ‘या’ वस्तू लावल्याने मिळते सुख-समृद्धी )

लक्षात ठेवा की गोळे जितके गोलाकार असेल तितकी चपाती सहज गोल होऊ शकेल.

चपाती बनवताना हे लक्षात ठेवा

गोळे हाताने सपाट करा आणि दोन्ही बाजूंनी कोरडे पीठ लावून लाटण्यास सुरुवात करा.

जर पीठ चिकटू लागले तर थोडे कोरडे पीठ लावा. पण कमीत कमी कोरडे पीठ लावा.

रोटी समान आणि गोल करण्याचा प्रयत्न करा.

तोपर्यंत गॅसवर तवा ठेवा आणि गरम होऊ द्या. नंतर चपाती भाजा.

( हे ही वाचा: Surya Grahan 2021: ‘या’ दिवशी लागणार सूर्यग्रहण; जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांवर पडणार प्रभाव )

चपाती एका बाजूला थोडीशी भाजली की दुसरी बाजू उलटा.

चपातीच्या दुसऱ्या बाजूने थोडी भाजल्यावर तव्यातून काढून चपाती डायरेक्ट गॅसवर भाजून घ्या.

तुमची चपाती तयार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2021 at 17:49 IST
Next Story
कुंडलीतील पाच दोष ठरतात त्रासदायक; एकही सुरू असेल तर…