Surya Grahan 2021: ‘या’ दिवशी लागणार सूर्यग्रहण; जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांवर पडणार प्रभाव

धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण समाप्तीनंतर दान-पुण्य केल्याने अशुभ परिणाम होत नाही. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल.

surya-grahan-2021-1
सूर्यग्रहण २०२१ (फोटो: जनसत्ता )

Surya Grahan (Solar Eclipse) December 2021: विज्ञानानुसार सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. पण भारतातील ग्रहणांना धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्वही आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहण असणे चांगले मानले जात नाही कारण त्याचा लोकांच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे ग्रहण काळात अनेक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण समाप्तीनंतर दान-पुण्य केल्याने अशुभ परिणाम होत नाही. ४ डिसेंबरला सूर्यग्रहण होणार आहे. या ग्रहणाशी संबंधित संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या.

सूर्यग्रहण कधी आणि कुठे दिसणार?

४ डिसेंबरला हे ग्रहण होणार आहे. भारतीय वेळेनुसार, ग्रहण सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि पहाटे तीन वाजून सात मिनिटांनी वाजता संपेल. हे सूर्यग्रहण अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, अटलांटिकचा दक्षिण भाग, ऑस्ट्रेलिया, दक्षिण भागात दिसणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, २०२१ सालचे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण वृश्चिक आणि अनुराधा नक्षत्रात विक्रम संवत २०७८ मध्ये कार्तिक महिन्याच्या अमावस्येला होईल. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल.

( हे ही वाचा: ‘या’ चार राशीचे लोक असतात खूप निडर; कोणताही धोका पत्करण्यात मागे हटत नाहीत)

सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीवर परिणाम होईल?

ग्रहणाच्या वेळी सूर्य वृश्चिक आणि ज्येष्ठ नक्षत्रात असेल. यामुळे या राशी आणि राशीच्या लोकांना या ग्रहणाचा सर्वाधिक फटका बसेल असे म्हंटले जात आहे. ग्रहणानंतर काही दिवस प्रत्येक कामात काळजी घ्यावी लागेल. धनहानी होण्याची दाट शक्यता आहे. या काळात घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा. कोणाचीही फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, रागावणे टाळा असा सल्ला दिला जात आहे.

( हे ही वाचा: Airtel वापरकर्त्यांसाठी शेवटची संधी! ‘हे’ रिचार्ज करा आणि वाचवा पैसे!)

सूतक लागणार की नाही?

ग्रहण भारतात होत नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळही वैध ठरणार नाही. सूर्यग्रहणाचा सुतक ग्रहणाच्या १२ तास आधी सुरू होतो. या काळात कोणतेही शुभ कार्य करायचे नाही अशी मान्यता आहे. यासोबतच पूजा करण्यासही मनाई केली जाते. सूर्यग्रहण काळात काहीही न खाण्या किंवा पिण्याचा सल्ला दिला जातो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Surya grahan 2021 solar eclipse on this day find out which zodiac sign will affect people ttg

ताज्या बातम्या